Councillor Slaps himself : अनेक राजकारणी मते मागण्यासाठी भलीमोठी आश्वासनं देऊन मतदारांना भुरळ पाडत असतात. पण एकदा निवडूण आल्यानंतर अनेक वर्षे ती कुठे गायब होतात ते कोणालाच कळत नाही. मात्र काही राजकारणी ही लोकांसाठी उपयुक्त अशी कामं करण्यासाठी धडपड करत असतात. अशाच एका नगरसेवकाने काम न करु शकल्याने स्वतःलाच शिक्षा दिली आहे. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) एका नगरसेवकाने लोकांची कामे पूर्ण न करता आल्याने स्वतःला चपलेनं मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.
आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील एका नगरसेवकाने सोमवारी आपल्या मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दल स्वतःला कानाखाली मारून घेतली आहे. नरसिपट्टणम नगरपालिकेच्या वॉर्ड 20 चे नगरसेवक मुलापार्थी रामराजू यांनी परिषदेच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आणि त्यादरम्यान त्यांनी स्वतःला चप्पलने मारले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मते मागताना नगरसेवकाने जनतेला अनेक आश्वासने दिल्याचे बोलले जात आहे. या आश्वासनांची पूर्तता न केल्याने ते स्वतःवरच नाराज होत नगरसेवकाने स्वत:ला चप्पलने मारत होता.
40 वर्षीय रामराजू यांनी निवडणुकीपूर्वी मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. विशेष म्हणजे ती आश्वासने राजू पूर्ण करू शकले नाहीत. त्यानंतर एका सभेत त्याने स्वतःला चप्पलने मारहाण केली. नरसिपट्टणम नगरपालिकेचे नगरसेवक रामराजू म्हणाले की, त्यांनी खूप प्रयत्न केले पण काही करता आले नाही. स्थानिक नागरी संस्थांचे अधिकारी समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नगरसेवकाने केला आहे.
नगरसेवक रामराजू ऑटो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. "मला नगरसेवक होऊन 31 महिने झाले आहेत. पण मला माझ्या भागात कोणतेही काम करता आले नाही. माझ्या परिसरात ड्रेनेज, वीज, स्वच्छता, रस्ता आदी समस्या अजूनही कायम आहेत. या कारणांमुळे मी स्वत:ला चप्पलने मारत आहे. मी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदारांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आतापर्यंत अपयश आले आहे," असे रामराजू म्हणाले.
प्रभाग क्रमांक 20 कडे स्थानिक पालिका अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत आहेत असा आरोपही रामराजूने केला आहे. आपल्या एकाही मतदाराला पाण्याचे कनेक्शन मिळालेले नाही, असे ते म्हणाले. सभेत नगरसेवक रामराजू भावूक झाले. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करण्यापेक्षा मरण बरे, असे रामराजू म्हणाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टीडीपीने रामराजू यांना पाठिंबा दिला होता.
తెలుగుదేశం పార్టీ తరపున గెలిచిన లింగాపురం గ్రామ గిరిజన ప్రజాప్రతినిధి ఆయన. పదవిలో ఉండి కూడా 30 నెలలుగా గ్రామంలో ఒక్క కుళాయి కూడా వేయించలేకపోయానని... దీనికంటే చచ్చిపోవడం నయమని కౌన్సిలర్ల సమావేశంలో కన్నీరు పెట్టుకుని, చెప్పుతో కొట్టుకున్నారాయన.#AndhraPradesh #NalugellaNarakam… pic.twitter.com/u6k4E5KXZy
— Telugu Desam Party (@JaiTDP) July 31, 2023
दरम्यना, तेलुगू देसम पार्टीने (टीडीपी) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर या नगरसेवकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. स्थानिक निवडणुकीत रामराजू यांना टीडीपीचा पाठिंबा मिळाला होता. रामराजू हे लिंगापुरम गावचे आदिवासी प्रतिनिधी असल्याचे ट्विटमध्ये लिहिले आहे. नगरसेवक होऊन 30 महिने उलटले तरी त्यांच्या गावात नळ बसवण्यात आलेला नाही.