अतिशय वेगात डोसा बनवतो हा दुकानदार; आनंद महिंद्रांनी विचारलं रोबोट भारी की माणूस?

महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर डोसा बनवणाऱ्या दुकानदाराचा व्हिडिओ शेअर केला आहे

Updated: Aug 20, 2021, 01:10 PM IST
अतिशय वेगात डोसा बनवतो हा दुकानदार; आनंद महिंद्रांनी विचारलं रोबोट भारी की माणूस? title=

नवी दिल्ली : महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर डोसा बनवणाऱ्या दुकानदाराचा व्हिडिओ शेअर केला आहे. रस्त्याच्या बाजूला डोसा विकणारा व्यक्ती अतिशय वेगाने डोसा बनवित आहे. मशीन पेक्षाही अधिक वेगाने काम करणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ सोशलमीडियावर वायरल होतोय.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.  एरवी देखील आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव असतात. त्यांनी शेअर केलेल्या इंटरेस्टींग पोस्टवर युजर्स नेहमीच व्यक्त होतात. 

नुकताच एका डोसा विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. हा व्यक्ती डोसा अतिशय गतीने बनवत आहे. तसेच त्याच वेगाने लोकांना देखील वाढत आहेत. या डोसा विक्रेत्याचा वेग पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

28 सेकंदांच्या या क्लिपमध्ये डोसा विक्रेत्याचा वेग पाहून आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये म्हटलेय की, हा व्यक्ती रोबोटच्या वेगालाही मागे टाकेल इतक्या वेगाने डोसा बनवतोय, हे पाहून मी थक्क झालोय. मलाही आता नक्की भूक लागली आहे.

आनंद यांच्या ट्वीटवर असंख्य युजर्स व्यक्त होत आहेत. हा व्हिडिओ कमीवेळात असंख्य लोकांनी रिट्विट केला आहे.