मुंबई : देशभरात शुक्रवारी 11 दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. गणेशभक्तांनी जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला. तसेच बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या अशी साद देखील घातली. उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील अनोख्या पद्धतीने बाप्पाला निरोप दिला आहे. महिंद्रा यांनी क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची खुप चर्चा रंगलीय.
गणेश भक्तांनी गणपती विसर्जन सोहळा साजरा केल्याच्या एका दिवसानंतर, आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत हत्तीचं बाळ सोंड हलवत आहे. हत्तीच्या बाळाचा हा क्युट व्हिडिओ आहे. अनेक य़ुझर्सना हा व्हिडिओ आवडला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतायत, "मला वाटत आहे की बाप्पा आपल्या सोंडेने आपला निरोप घेत आहेत आणि आम्ही त्यांना गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी साद घालतोय.
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्या ट्विटवर एका युजरने कमेंट केली, "गणपती आफ्रिकेला गेला? असे म्हटले. तर दुसर्या युजरने हत्तीच्या बाळाच्या खेळकरपणाची तुलना क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या सिग्नेचर स्टेपशी केली, ज्यामध्ये तो तलवारीप्रमाणे आपली बॅट फिरवतो आहे.
I think Bappa is bidding us goodbye with his trunk…and we say: Ganpati Bappa Morya, Pudhchya Varshi Lavkar Ya! See you next year… pic.twitter.com/SN7Z7uuEzC
— anand mahindra (@anandmahindra) September 10, 2022
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर तुफान कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकचं चर्चा आहे.