नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कधी डिसचार्ज मिळेल हे अद्याप कळालेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे त्यांची कोरोना चाचणी देखील निगेटीव्ह आली आहे. काही दिवसांपूर्वीच ते कोरोना व्हायरसवर मात करून आपल्या घरी परतले होते.
त्यानंतर ते घरीच होते. दरम्यान ते कोणाला भेटत देखील नव्हते. पण अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.
कोरोना झाल्याची माहिती अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. त्याचप्रमाणे याकाळात संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना त्यांनी कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला होता.