Viral Video: दारुचे व्यवन म्हणजे सर्वात वाईट व्यसन. बऱ्याचदा दारु पिणारे स्वत:वर कंट्रोल करु शकत नाहीत. मग ते आपली दारु पिण्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी वाटेल ते करतात. असाच एक भयानक पराक्रम एका Ambulance चालकाने केला आहे. उपचाराची गरज असलेल्या रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहचवण्याची जबाबदारी Ambulance च्या ड्रायव्हरवर असते. ओडिशा(Odisha) मध्ये ड्रायव्हरने हॉस्पीटल ऐवजी थेट वाईन शॉप अर्थात दारुच्या दुकानासमोर Ambulance थांबली आणि आपली दारु पिण्याची इच्छा पूर्ण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे( shocking incident).
@cheguwera नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. Ambulance मध्ये स्ट्रेचवर एक रुग्ण झोपलेला आहे. त्याच्या पायाला बँडेज दिसत आहे. या रुग्णासह एक महिला आणि एक दहा ते बारा वर्षाचा मुलगा Ambulance मधून प्रवास करताना दिसत आहे. सोबत Ambulance चा ड्रायव्हर देखील आहे.
ड्रायव्हरने भर रस्त्यात Ambulance थांबवली आहे. एका बाटलीतून तो दारु दोन ग्लासांमध्ये भरतो. यानंतर तो एक ग्लास Ambulance मध्ये पेशंटला देतो आणि दुसरा ग्लास स्वत: घेतो. Ambulance मधील पेशंट स्ट्रेचरवर झोपूनच दारु पिताना दिसत आहे. रस्त्याच्या मध्येच Ambulance ड्रायव्हर आणि पेशंटची दारु पार्टी सुरु आहे.
रस्त्याने जाणाऱ्या लोकांना हा प्रकार पाहून धक्का बसला. लोकांनी मोबाईलमध्ये या प्रकाराचे रेकॉर्डिंग केले. त्यांनी याबाबत Ambulance ड्रायव्हरकडे विचारणा केली असताना तो लोकांशी हज्जत घालताना दिसत आहे. पेशंटला दारु प्यायचे असल्याचे देखील Ambulance ड्रायव्हरने सर्वांना सांगितले. अखेरीस Ambulance ड्रायव्हर सायरन वाजवत पेशंटला घेवून निघून जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा ड्रायव्हर कोण आणि कुठला आहे. याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच Ambulance मधील पेशंट बाबातही काही समजू शकलेले नाही. Ambulance थांबवून रस्त्यात स्वत: दारु पिवून टल्ली होणाऱ्या आणि रुग्णाला दारु पाजणाऱ्या या ड्रायव्हरवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. Ambulance दारुच्या दुकानासमोर थांबली, यानंतर ड्रायव्हरने रस्त्यावर दारु पार्टी केली तेव्हा वाहतुक पोलिस काय करत होते? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
In a shocking incident that took place in #Odisha #india ,a video of an ambulance driver drinking with a patient while on their way to hospital. In the video, the ambulance driver can be seen drinking and even sharing the drink with a patient. pic.twitter.com/gNJ07tECV6
— S a m (@cheguwera) December 20, 2022