Shraddha Walkar Murder Case: मुंबईतील श्रद्धा वालकर (Shraddha Murder case) मर्डर केसनं अवघा देश हादरून गेलाय. श्रद्धा मर्डर केसमध्ये नेहमी नवीन धक्कादायक खुलासे होत आहे. दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकरचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यानं मतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले, ते फ्रिजमध्ये स्टोअर केलं. त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या परिसरात जाऊन ठराविक अंतरानं टाकून दिले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा उलगडा आता झाला. या प्रकरणात आफताबला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज आफताबने स्वत:चा जामीन अर्ज मागे घेतला आहे. नेमकं आफताबला (Aaftab Poonawala) पश्चाताप झाला की कसली भीती आहे म्हणून त्याने जामीन अर्ज मागे घेतला आहे.
दरम्यान श्रद्धा वालकर हत्येप्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयातून जामीन अर्ज मागे घेतला आहे. आफताबच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरूवार (22 December) सकाळी 11 वाजता सुरू झाली. तोपर्यंत आफताबचे वकील न्यायालयात पोहोचले नव्हते. यापूर्वी 17 डिसेंबर रोजी आफताबला साकेत न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. आफताबने न्यायालयाला सांगितले की, मला जामीन अर्ज दाखल करायचा नाही. आफताबचा जामीन अर्ज त्याच्या वकिलाच्या वतीने दाखल करण्यात आला होता, त्यानंतर न्यायालयाने म्हटले की, यासाठी आफताबची संमती आवश्यक आहे. आफताबने आपल्या वकिलाशी बोलल्यानंतर जामीन अर्ज मागे घेतला. यानंतर न्यायालयाने याचिका मागे घेण्याची परवानगी देत खटल्याची सुनावणी फेटाळून लावली आहे.
वाचा : लिलाव पाहून हैराण झालात, फक्त ही एकच गोष्ट पाहा आणि सर्वात महागडे खेळाडू जाणून घ्या...
श्रद्धाच्या वडिलांच्या वकील सीमा कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने त्याच्या वकिलाला जामीन अर्ज दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्याने आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे. तर दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयात आफताब पूनावालाच्या आवाजाचा नमुना घेण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांच्या अर्जावर उद्या, शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. 17 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान, प्रेयसी श्रद्धा वालकरची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असलेल्या आफताबने न्यायालयाला असे सांगितले की, त्याला जामीन अर्जाबाबत कोणतीही माहिती नाही. त्यांनी केवळ वकलतनामावर स्वाक्षरी केली होती, मात्र जामीन अर्ज दाखल करण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्याने म्हटले आहे.
आफताब पूनावाला तिहार तुरुंगात आहे. तुरुंग अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आफताबने त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यास नकार दिला आहे. तो त्याच्यासोबत कोठडीतील इतर कैद्यांशी बोलतही नाही. कारागृह अधीक्षकांनी आफताबला भेटी आणि फोन वापरण्याच्या नियमांची माहिती दिली. परंतु त्याने कोणाशीही भेटण्यास किंवा बोलण्यास नकार दिला. त्याच्या या वागण्याने अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत कारण तो फोनवरही घरच्यांशी बोलत नाही.
आफताब पूनावाला यांनी 18 मे रोजी आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा (27) हिची हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि दक्षिण दिल्लीच्या आसपासच्या जंगलात फेकून दिले. त्यानंतक आफताबला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.