शिक्षणमंत्र्यांच्या ताफ्याची अ‍ॅम्ब्युलन्सला धडक; CCTV मध्ये कैद झाला भीषण अपघात, पाहा Video

Ambulance Accident, Viral Vide: शिक्षणमंत्र्याच्या ताफ्यातील गाडीने एका रुग्णवाहिकेला जोरदार धडक (Pilot vehicle hit Ambulance) दिल्याची घटना घडली. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

Updated: Jul 14, 2023, 12:24 AM IST
शिक्षणमंत्र्यांच्या ताफ्याची अ‍ॅम्ब्युलन्सला धडक; CCTV मध्ये कैद झाला भीषण अपघात, पाहा Video title=
Ambulance Accident, Viral Video

Accident Viral CCTV Video: मंत्र्याचा ताफा असो वा अ‍ॅम्ब्युलन्स, नेहमी या दोन्ही वाहनांना प्राधान्य दिलं जातं. अनेकदा रुग्णावाहिकेसमोर मंत्र्यांचा ताफा देखील अडवला जातो. तर कधी मंत्र्यांच्या ताफ्यामुळे रुग्णवाहिका ट्रॉफिकमध्ये अडकलेली दिसते. अशातच आता धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षणमंत्र्याच्या ताफ्यातील गाडीने एका रुग्णवाहिकेला जोरदार धडक (Pilot vehicle hit Ambulance) दिल्याची घटना घडली. त्याचा व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील ही घटना कोल्लम जिल्ह्यातील कोट्टारक्करा येथील आहे. शिक्षणमंत्री (Kerala Education Ministers) व्ही शिवनकुट्टी यांचा ताफा पुलमन जंक्शनवरून जात होता. मंत्र्यांच्या ताफ्याला जाऊ देण्यासाठी काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती. मंत्र्यांचा ताफा पुढे जात असताना वाटेत एक रुग्णवाहिका आली. त्यावेळी रुग्णवाहिका पोलिसांच्या जीपला धडकणार होती. मात्र, थोड्या वेळाच्या अवधीतच पोलिसाच्या गाडीने रुग्णावहिकेला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, रुग्णवाहिका रस्त्यावरच उलटली. अपघाताच्या समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रुग्णवाहिका सतत पुढे जात असल्याचे दिसून येते. मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं पुढे जात राहतात, असं व्हिडिओमध्ये दिसतंय.

एवढं नाही तर, अपघातात सहभागी असलेल्या मंत्र्यांच्या ताफ्याचं वाहन काही अंतरावर उभ्या असलेल्या दुचाकीला देखील धडकलं. धडकल्यानंतर ताफ्यातील जीप थांबली. दुचाकीवर दोघंजण जात होते. त्याला दुखापतही झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर मंत्री गाडीतून बाहेर पडल्याची माहिती आहे. मात्र, वृत्तानुसार जखमींच्या प्रकृतीची विचारपूस करून ते तेथून निघून गेले. त्यामुळे लोकांचा मनाच संतापाची लाट उसळली आहे.

पाहा Video

दरम्यान, मंत्री गेल्यानंतर अनेकांनी शिक्षणमंत्र्यावर टीका केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या तुफान ट्रेंडिंगमध्ये असल्याचं दिसून येतंय. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. अपघातानंतर आसपासच्या लोकांनी धाव घेत अॅम्ब्यूलन्स उभी केली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवलं आहे.