Chinese Loan App : लोन अॅपच्या जाळ्यात अडकून मध्यप्रदेशमध्ये दोन मुलांची हत्या करुन पती-पत्नीने आत्महत्या (Bhopal Family Suicide Case) केल्याची घटना ताजी असतानाच आता बंगळुरुमध्ये इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने याच कारणाने आत्महत्या (Student Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या निमित्ताने सायबर गुन्हेगारीचं (Cyber Crime) जाळ किती भयानक होत चाललं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. झटपट आणि कमी कागदपत्रांमध्यो कर्ज देण्याच्या आमीषाला बळी पडून अनेकजणं ऑनलाईन कर्ज (Online Loan) काढतात. पण इथेच त्यांची फसवणूक होते. या फसव्या दलदलीत ते फसत जातात आणि शेवटी आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरत नसल्याचं समोर आलं आहे. यातीह चीनी अॅपने (Chinese App) भारतात अनेकांना गंडा घातला आहे.
याच चीनी अॅपच्या जाळ्यात बंगळुरुमधला एक विद्यार्था अडकला. चीनी अॅपच्या माध्यमातून त्याने ऑनलाईन कर्ज काढलं. पण यानंतर कर्ज वसूल करण्यासाठी त्याल रिकव्हरी एजंटच्या धमक्यांना सामोरं जावं लागलं. शेवटी या त्रासाला कंटाळून 22 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. या विद्यार्थ्याने ऑनलाईन चिनी अॅपच्या माधम्यातून कर्ज घेतलं, पण त्याला हे कर्ज चुकतं करता आलं नाही.
तेजय असं या विद्यार्थ्याचं नाव होतं, तो बंगळुरुच्या जलाहल्ली इथं राहात होता. येलहंकामधल्या मिनाक्षी कॉलेजमध्ये तो इंजिनिअरिंगचा शिक्षण घेत होता. कर्ज घेतल्यानंतर त्याला रिकव्हरी एजंटकडून त्रास देण्यात येऊ लागला. कर्ज फेडलं नाहीस तर तूझे प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकी त्याल देऊ लागली. यामुळे तेजस प्रचंड तणावात होता.
याप्रकरणी तेजसच्या कुटुंबिायांनी पोलिसांत तक्रात दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजसने 'स्लाइस एंड किस' या चीनी अॅपच्या माध्यमातून कर्ज घेतलं होतं. तेजसच्या वडिलांना या गोष्टीची भनक लागल्यानंतर त्यांनी तेजसला विश्वासातून घेऊन नेमका प्रकार समजून घेतला. मुलाचं सर्व कर्ज चुकतं करण्यास ते तयार झाले. पण अॅपच्या एजंटांनी तेजसला त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्याला धमकीचे फोन येऊ लागले. आत्महत्या करण्याच्या एक दिवस आधी तेजसच्या वडिलांनी कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी काही वेळ मागितला होता. पण एजंट या गोष्टीला तयार झाले नाहीत.
घटनेच्या दिवशी रिकव्हरी एजंट्सने तेजसला अनेकवेळा फोन करुन त्रास दिला. त्याला मारण्याची, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली गेली. या सर्व गोष्टीला कंटाळून तेजसने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापूर्वी तेजसने सुसाइड नोट लिहिली होती. त्यात त्याने आई बाबांची मागितली. मला आत्हमत्येशिवाय पर्याय उरला नाही, मी कर्ज फेडण्यास अयशस्वी ठरलो मला माफ करा, अलविदा असं त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं.