Allahabad Courts Viral Photo : हल्ली लोक सगळेच फोटो सोशल मीडियावर शेअर (Share) करत असतात. दररोज अनेक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत असतात. त्यातील काही फोटो आपलं मनोरंजन (Entertainment) करतात तर काही फोटो खुपच धक्कादायक असतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. व्हायरल झालेला फोटो अलाहाबाद न्यायालयाच्या (Allahabad Court) आतील असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये असे दिसून येते की कोर्ट रूममध्ये ऑर्डरलीने त्याच्या कमरेला पेटीएमचा क्यूआर कोड (Paytm QR Code) घातलेला दिसत आहे. व्हायरल फोटोची छाननी केली असता तो अलाहाबाद कोर्टाचाच असल्याचे आढळून आले. (allahabad court Have you seen this act done by the bundle lifter in the court to extort money Viral Photo nz)
कोर्टाच्या आवारात डिजिटल वॉलेटचा (Digital wallet) वापर करून लाच घेतल्याच्या आरोपाखाली कोर्ट बंडल लिफ्टर (Bundle lifter), ज्याला 'कोर्ट जमादार' असेही म्हणतात त्याला निलंबित करण्यात आले आहे. न्यायमूर्ती अजित सिंग यांच्या 29 नोव्हेंबरच्या पत्राचा विचार करून मुख्य न्यायमूर्ती राजेश बिंदल यांनी न्यायालयाच्या जमादारावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत हा निर्णय घेतला.
न्यायमूर्ती अजित सिंह यांच्या कोर्टात जमादाराची कर्तव्ये होती. न्यायालयाच्या आवारात गणवेश परिधान केलेले आणि पेटीएम क्यूआर कोड (Paytm QR Code) असलेले न्यायालय जमादार राजेंद्र कुमार यांचे कथित छायाचित्र नुकतेच उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित करण्यात आले. हा फोटो 29 नोव्हेंबरपासून सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे.
अलाहाबाद कोर्टात अशा प्रकारची प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. जेव्हा जेव्हा वकिलाच्या बाजूने निर्णय येतो तेव्हा जमादार बक्षीस मागतात. हे बक्षीस पैश्यांच्या स्वरुपात असते. मग अशावेळेस वकीलही पैसे देण्यास मागेपुढे पाहत नाहीत, तेही सहज देतात. मात्र, या जमादाराच्या अनोख्या पद्धतीने पेच निर्माण झाला आहे. या संदर्भात लोकांनी सांगितले की जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा वकील सुट्टे पैसे नाहीत असं सांगून पळ काढण्याचा प्रयत्न करायचे म्हणून जमादाराने अनोखी पद्धत सुरु केली. सुट्टे पैसे नाहीत ही समस्या निर्माण होऊ नये म्हणून जमादार राजेंद्र कुमार यांनी पेटीएमचा क्यूआर कोड त्यांच्या कमरेला लावला होता. म्हणजे, जर वकिलाने सुट्टे पैसे नसल्याचे सांगितल्यास, तर पेटीएमचा क्यूआर कोड दाखवून ते पैसे घेत असे.