Viral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर

Air India Flight Video : एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फ्लाइटमध्ये छतातून अचानक पाणी पडायला लागलं. 

नेहा चौधरी | Updated: Dec 1, 2023, 12:14 PM IST
Viral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर title=
air india passengers onboard gatwick amritsar flight face water leakage inside cabin video viral on Internet trending news

Air India Flight Video : विमानातून असंख्य लोक आज प्रवास करत असतात. सुखकर आणि कमी वेळात आपण इच्छुक स्थळी लवकर पोहोचतो. त्यामुळे कामानिमित्त अनेक लोक विमानातून दररोज प्रवास करत असतात. तर अनेकांना विमानातून प्रवास करताना भीती वाटते. असाच हृदयाचे ठोके चुकविणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामधील दृश्य पाहून आपल्याला धडकी भरते. दिल्लीहून लंडन गॅटविक विमानतळावर जाणऱ्या या फ्लाइटमध्ये अचानक छतातून पाणी टपकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. (air india passengers onboard gatwick amritsar flight face water leakage inside cabin video viral on Internet trending news)

महागड तिकीटं आणि एवढ्या खर्च करुन जर विमानात असं काही घडणार असेल तर प्रवाशी हैराण झाले आहेत. एअर इंडियाच्या फ्लाइटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. दिल्ली ते लंडन गॅटविक विमानतळापर्यंत उड्डाणाच्या वेळी सर्व काही ठिक होतं. पण आकाशात गेल्यानंतर काही वेळानंतर प्रवाशादरम्यान एअर इंडियाच्या बोईंग B787 ड्रीमलाइनरला ओव्हरहेड स्टोरेजच्या केबिन गळतीचा नाहक त्रास सहन करावा लागला. या दृश्याने विमानातील प्रवाशी हैराण झाले. प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण होतं. काही प्रवाशांना आपल्या जागेवरुन उठावं लागलं. 

हा व्हिडीओ सर्वांना बुचकळ्यात पाडतोय. केबिन क्रूने प्रसंगावधान दाखवत वेळीच परिस्थितीवर मात केल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तर एअर इंडियाचे प्रवक्ता यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे. 

दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला विमानातील अनेक धक्कदायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये एयर होस्टेस, क्रू मेबर्ससह प्रवाशांसोबत गैरवर्तनासोबत लघवी कांडचे संतापजनक प्रकार समोर आले होते.