लग्नानंतर पत्नीला नवऱ्याचे भयंकर सत्य समजले, दोन दिवसांतच मोडला संसार

Trending News: लग्नाला दोनच दिवस झाले होते, नवरी माहेरी आली तिथे नवऱ्याचे भयंकर सत्य समजले आणि दोनच दिवसात लग्न मोडले. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 1, 2023, 11:27 AM IST
 लग्नानंतर पत्नीला नवऱ्याचे भयंकर सत्य समजले, दोन दिवसांतच मोडला संसार title=
Bride Breakup Groom After Two Days of wedding over husband love affair with girl

Trending News In Marathi: लग्नाला दोन दिवस झाले अजून दारातील लग्नाचा मांडवही उतरला नव्हता, तर नवरा-नवरीच्या अंगावरील हळदही तशीच होती. दोन दिवसांतच पती-पत्नीचा संसार मोडला आहे. पत्नीने पतीसोबत राहण्यास नकार दिला. कुटुंबीयांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तिने कोणाचच ऐकलं नाही. अखेर सासरच्या मंडळीने तिचा निर्णय मान्य करत तिला जाण्याची परवानगी दिली. या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाहीये. मात्र, पती-पत्नी दोघांमध्ये नेमकं असं काय घडलं की नवरीने इतका टोकाचा निर्णय घेतला. (Husband And Wife News)

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील हे प्रकरण असून लग्नानंतर दोन दिवसांतच पती-पत्नी यांचे लग्न मोडले आहे. पत्नीने पतीसोबत राहण्यास नकार दिल्यानंतर सासरच्या मंडळीने लग्नातील हुंडादेखील परत केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाचे लग्नाच्या आधीपासूनच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. चार वर्षांपासून त्यांच्यात संबंध होते. तो नेहमी तीला आश्वासन देत होता मात्र तिच्यासोबत लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. त्याचदरम्यान 26 नोव्हेंबर रोजी नगला मदरी निवासी येथील दुसऱ्याच मुलीसोबत त्याने लग्न केले. 

28 नोव्हेंबर रोजी नवरदेवाच्या प्रेयसीला घडलेली घटना घडली. प्रियकराने धोका दिल्याचे लक्षात येताच ती संतापली व तडक प्रियकराचे घर गाठले. तसंच, सगळ्यांसमोर त्याच्यावर धोका दिल्याचा आरोप केला. तसंच, त्याच्या पत्नीच्या माहेर जाऊनही प्रेयसीने गोंधळ घातला. त्यांच्या प्रेमसंबंधाचे पुरावे दाखवून नवरदेवावर आरोप केला. हे सगळे पाहून नवरीच्या पायाखालची जमिनच हादरली. ज्याच्यासोबत दोन दिवसांपूर्वीच लग्न झाले सात वचनं घेतली त्या व्यक्तीने इतका मोठा धोका दिल्याने ती संतापली व तिने सासरी परत न जाण्याचा निर्णय घेतला. 

या घटनेनंतर जेव्हा नवरदेव पत्नीला परत आणण्यासाठी गेला तेव्हा तिने परत जाण्यास नकार दिला. नवरदेवाने व त्याच्या कुटुंबीयानी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तिने कोणत्याही परिस्थितीत परत न जाण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर, वधुपक्षाने दिलेला हुंडा म्हणजेच 5 लाख रोख रक्कम आणि हुंडासुद्धा परत देण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिस तक्रार करण्यात आली नाहीये. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक कुमार रणविजय सिंह यांनी दिली आहे.