काँग्रेसचे बंडखोर नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेसचे बंडखोर नेते अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला भाजपमध्ये दाखल.

ANI | Updated: Jul 19, 2019, 03:14 PM IST
काँग्रेसचे बंडखोर नेते अल्पेश ठाकोर यांचा भाजपात प्रवेश title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे बंडखोर नेते अल्पेश ठाकोर आणि धवलसिंह झाला यांनी  भाजपमध्ये प्रवेश केला. या महिन्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजुने मतदान केल्यानंतर या दोघांनी आमदारकीचा राजीनामा देत पक्षही सोडला होता. ठाकोर राधनपूरमधून तर झाला हे बयाड इथून निवडून आले होते. 

ठाकोर समाजातील नेत्यांशी चर्चा करून भाजपमध्ये जाण्याचा निश्चय केल्याचे ठाकोर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विकासाच्या धोरणांमुळे आपण भाजपमध्ये आल्याचे ते म्हणाले. 

दरम्यान, १२ बंगाली चित्रपट आणि दूरदर्शन कलाकारांनी भाजपचे नेते मुकुल रॉय आणि दिलीप घोष यांच्याउपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.