मुंबई : रेल्वेने प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे रेल्वे स्थानक परिसर आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवास करताना तुम्ही एखादी वस्तू किंवा खाद्यपदार्थ घेतला असेल, मात्र तुम्हाला विक्रेता बिल देत नसेल तर खाद्यपदार्थासाठी पैसे द्यावे लागणार नाही. तो खाद्यपदार्थ मोफत असेल. तसा निर्णय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
अनेकवेळा रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ किंवा एखादी वस्तू खरेदी केली तर त्याची बिलाची पावती विक्रेत्यांकडून मिळत नाही. मात्र, आता रेल्वे प्रशासनाकडून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. हा नियम कालपासून लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत खाद्यपदार्थ घेतल्यानंतर कोणत्याही विक्रेत्यांकडून बिल मिळाले नाही तर खरेदी केलेल्या वस्तू मोफत मिळतील, असा आता रेल्वेचा नवा नियम आहे.
रेलवे द्वारा No Bill, No Payment की नीति अपनाते हुए विक्रेताओं द्वारा ग्राहकों को बिल देना अनिवार्य किया गया है।
ट्रेन अथवा रेलवे प्लेटफार्म पर यदि कोई विक्रेता आपको बिल देने से इंकार करता है तो आप को उसे पैसे देने की आवश्यकता नही है। pic.twitter.com/qxcnnjtemb
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 18, 2019
रेल्वेकडून No Bill, No Payment ही योजना आणली आहे. विक्रेत्यांकडून ग्राहकांना बिल देने बंधनकारक आहे. रेल्वे किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर जर एखादा विक्रेता आपल्याला बिल देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्याला पैसे देण्याची गरज नाही. यासोबतच, पीयूष गोयल यांनी एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. त्यामुळे ही योजना समजण्यास मदत होत आहे.
दरम्यान, प्रवास करताना रेल्वे प्रवाशांकडून अनेकवेळा विक्रेत घेतल्या वस्तूचे बिल देत नाही. तसेच जास्त पैसे आकारत असत. याबाबत प्रवशांकडून अनेक तक्रारी रेल्वेकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. याची दखल घेत पियुष गोयल यांनी यांची माहिती संसदेत सांगत हा नवा नियम केल्याचे सांगितले.