शर्ट काढायला सांगिल्याने मंदिरात प्रवेश न करताच बाहेरुन दर्शन घेऊन CM रवाना; नक्की घडलं काय

CM Siddaramaiah : सनातनच्या मुद्द्यावरुन देशभरात सध्या गदारोळ सुरु आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलेल्या एका किस्स्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बंगळुरुमध्ये बोलताना सिद्धारामय्या यांनी हे विधान केले आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 7, 2023, 01:08 PM IST
शर्ट काढायला सांगिल्याने मंदिरात प्रवेश न करताच बाहेरुन दर्शन घेऊन CM रवाना; नक्की घडलं काय title=
(फोटो सौजन्य - PTI)

तामिळनाडूचे (Tamil Nadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांचे पुत्र आणि राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या विधानामुळे देशात वादंग निर्माण झाला आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी शर्ट न काढल्याने केरळमधील मंदिरात प्रवेश केला नाही असे सांगून आणखी एका वादाला तोंड फोडले आहे. काँग्रेस नेते आणि समाजसुधारक नारायण गुरू यांच्या 169 व्या जयंतीनिमित्त बंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते.

"एकदा मी केरळमधील एका मंदिरात गेलो होतो. त्याने मला माझा शर्ट काढून आत येण्यास सांगितले. मी मंदिरात जाण्यास नकार दिला आणि त्यांना सांगितले की मी बाहेरून प्रार्थना करेन. ते काही लोकांना शर्ट काढायला सांगत होते, सगळ्यांनाच नाही. ही अमानवी प्रथा आहे. देवासमोर सर्वजण समान आहेत," असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं.

भाजप हा गरिबांचा शत्रू 

"भाजपचे लोक गरिबांचे हितचिंतक आहेत का? नाही, ते नाहीत. आम्ही त्यांना फुकट तांदूळ मागितले नाही, आम्ही त्यांना 36 रुपये किलो दराने पैसे देत होतो. सुरुवातीला त्यांनी हो म्हटलं, पण शेवटच्या क्षणी त्यांनी नकार दिला. ते किती घृणास्पद आहेत हे तुम्हा सर्वांना कळले पाहिजे. ते गरिबांचे शत्रू आहेत, त्यांच्यात माणुसकी नाही. केंद्र सरकारने एफसीआयला सूचना दिल्या आहेत की त्यांनी आम्हाला तांदूळ देऊ नये," असेही सिद्धरामय्या म्हणाले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की गरीब लोकांना मोफत तांदूळ दिला तर ती राज्ये दिवाळखोर होतील. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही पाच हमीभाव लागू करू आणि आम्ही राज्याचे दिवाळखोरी होऊ देणार नाही. राज्यात पाचपैकी चार निवडणूक हमीपत्रे लागू करण्यात आली आहेत," असे सिद्धरामय्या म्हणाले.