Priyanka Gandhi: केरळच्या वायनाडच्या लोकसभा खासदार प्रियंका गांधी या सोमवारी संसदेत पॅलेस्टाइनची बॅग घेऊन पोहोचल्या होत्या. तर मंगळवारी प्रियंका गांधी बांग्लादेशच्या अल्पसंख्यांकाचा आवाज दर्शवणारी बॅग घेऊन पोहोचली होती. प्रियंका गांधी यांच्या बॅगवर 'बांगलादेशच्या हिंदू आणि ख्रिश्चनांसोबत उभं राहा' असा संदेश लिहिण्यात आला होता. प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या अन्य खासदारांनाही संसदेच्या बाहेर बांगलादेशच्या अल्पसंख्यांकाच्या समर्थनांसाठी प्रदर्शन केले. तसंच घोषणाबाजीदेखील केली.
सोमवारी फिलिस्तीनच्या बॅगमुळं प्रियंका गांधी यांना सत्तापक्षाच्या सदस्याने घेरलं होतं. एकीकडे भाजपाच्या नेत्यांनी प्रियंका गांधी यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तर, दुसरीकडे काँग्रेसह अनेक विरोधी पक्ष त्यांच्या बचावासाठी सरसावले होते. केंद्रीय मंत्री बीएल वर्मा यांनी प्रियंका गांधी वाड्राच्या पॅलेस्टाइनच्या बॅगवर टीका करत म्हटलं होतं की, ते मुस्लिम तुष्टिकरणच्या मुद्द्यावर राजकारण करत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी दोघेही परदेशी वस्तूंचा प्रचार करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपाचे राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांनी म्हटलं आहे की, गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्यांची मानसिकता विदेश आहे. विदेशी चेहरा दर्शवतात. तर, केंद्रीय राज्यमंत्री बनवारी लाल वर्मा यांनी म्हटलं आहे की, प्रियंका गांधी फिलिस्तीन बॅग घेऊन आल्या आहेत. त्यांनी भारताची बॅग घेऊन यायाला हवं. संबंधित मुद्दे घेऊन ते वाद उकरुन काढत आहेत.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पॅलेस्टाइनच्या नागरिकांच्या समर्थनासाठी आणि एकजूटता दाखवण्यासाठी एक हँडबॅग घेऊन संसदेत पोहोचल्या होत्या. ज्यावर फिलिस्तीन असं लिहण्यात आलं होतं. प्रियंका गांधी जी बॅग घेऊन संसदेत गेल्या होत्या त्यावर पॅलेस्टिन (Palestine) लिहिलं होतं. त्यात पॅलेस्टिनचे प्रतीक असलेले कलिंगडदेखील होते. याला पॅलेस्टिनचे प्रतीक म्हणून मानले जाते. कलिंगड पॅलेस्टिनच्या संस्कृतीचा एक हिस्सा मानला जातो. पॅलेस्टिनचे लोक एकजुटता दाखवण्यासाठी नेहमीच कलिंगडची एका फोडीचा इमोजी किंवा फोटो वापरतात.