गोव्यानंतर देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

भारतासाठी दिलासादायक बातमी

Updated: Apr 30, 2020, 09:53 PM IST
गोव्यानंतर देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त title=

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. हा आकडा दररोज वेगाने वाढत आहे, जो चिंतेचा विषय आहे. पण यामध्ये काही दिलासादायक बातम्या ही येत आहेत. सोमवारी मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी माहिती दिली की, त्यांच्या राज्यात आता एकही कोरोनाचा रुग्ण नाही.

एन. बीरेनसिंग यांनी ट्विट केले की, 'मणिपूर आता कोरोना मुक्त राज्य असल्याचं सांगताना मला आनंद होतोय. कोरोनाचे आढळलेले दोन्ही रुग्ण आता बरे झाले आहेत. दोन्ही रुग्णांची टेस्ट नेगेटिव्ह आली आहे. त्यानंतर राज्यात कोणतेही नवीन रुग्ण आढळलेले नाही.'

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील लोकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे हे शक्य झाले. पण राज्यात अद्याप लॉकडाऊनमधून पूर्णपणे सूट मिळण्याची शक्यता नाही.

मणिपूर हे देशातील दुसरे राज्य आहे ज्याने स्वत: ला कोरोना मुक्त घोषित केले आहे. यापूर्वी रविवारी गोवा सरकारने त्यांच्या राज्यात कोरोनाचा कोणताही रुग्ण नसल्याची माहिती दिली होती.

रविवारी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले होते की, राज्यात आतापर्यंत एकूण 7 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे राज्यात कोरोना विषाणूचे कोणतेही नवीन रुग्ण आढळले नाही. त्यांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे अनुसरण करणार्‍या लोकांचे आभार मानले.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही 3 मे पर्यंत लॉकडाऊन काटेकोरपणे पाळले पाहिजे आणि याकडे कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष करू नये असे आवाहन केले आहे.