Shraddha Murder Case, नवी दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात( Shraddha Walker murder case) धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिस आरोपी आफताबची कसून चौकशी करत आहेत. आफताब चौकशी दरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळेच त्याची नार्को टेस्ट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. दरम्यान पॉलिग्राफी टेस्टमध्ये आफताबने धक्कादायक कबुली दिली आहे.
आरोपी आफताब(Accused Aaftab) हा श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर होता. आफताबने(Accused Aaftab) तिची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज ते हे तुकडे एक एक करुन महरौली जंगलात(Mehrauli Forest) फेकत होता. पोलिस त्याची कसून चौकशी आहेत.
श्रद्धाचा मारेकरी आफताबवर क्राईम, थ्रिलर मूव्हींचा प्रभाव होता. अशी कबुली आफताबने पॉलिग्राफी टेस्टमध्ये दिली आहे. आफताबची सोमवारी नार्को टेस्ट होण्याची शक्यता आहे. आज आफताबला कोर्टात हजर केले असता त्याला 13 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
श्रद्धा हत्याकांडाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी 200 जणांची सर्वात मोठी टीम तयार केली आहे. आतापर्यंत श्रद्धाचा जबडा तसंच 18 हाडं पोलिसांना सापडली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीसांनी आरोपी आफताबला घेऊन मुंबईतील भाईंदरच्या खाडीत देखील सर्च ऑपरेशनदेखील केले. या सर्च ऑपरेशन दरम्यान पोलिसांना भाईंदरच्या खाडीत श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केलेला चाकू सापडला आहे. पोलिसांच्या हाती लागलेला हा खूप मोठा पुरावा मानला जात आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आरोपी आफताबने एका मोठ्या करवतसह पाच चाकुंचा वापर केला होता. चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना ही माहिती दिली. पाच चाकु पोलिसांनी हस्तगत केले आहेत.