बेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ

''बघतोय रिक्षावाला...गं वाट माझी...'',तब्बल 3 वर्ष 'वेटिंगवर', बेल्जियमची तरूणीने रिक्षावाल्यासोबत बांधली लग्नगाठ 

Updated: Nov 29, 2022, 02:00 PM IST
बेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ  title=

Belgium Girl fell in love with an Indian : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम अस म्हणतात, पण प्रत्येकवेळीच ते सेम असेल असे सांगता येत नाही, कारण काही प्रेमप्रकरण याला अपवाद ठरतात. अशीच अपवाद ठरणारी लव्हस्टोरी आता समोर आली आहे. या लव्हस्टोरीत एका 27 वर्षीय बेल्जियमच्या तरूणीने भारतातल्या एका 30 वर्षीय रिक्षावाला आणि टूरीस्ट गाईड असलेल्या तरूणासोबत लग्नगाठ बांधली आहे. या त्यांच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा : जपानी गुडीया भारतीय तरूणाच्या प्रेमात! दोन वर्षानी बांधली लग्नगाठ

हिंदू रितीरिवाजानुसार लग्न

बेल्जियमची केमिली आणि भारताचा अनंत राजू या दोघांनी 25 नोव्हेंबर 2022 ला लग्नगाठ बांधली आहे. कर्नाटकच्या विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार या दोघांनी लग्न केले आहे. या लग्न सोहळ्यात केमिलीकडून बेल्जिअमची मंडळी आणि आणि अनंत राजूकडून त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. 

हे ही वाचा : अंगणवाडी सेविका बनली पोलीस उपनिरीक्षक! भावांनी खांद्यावर उचलून गावभर फिरवल

अशी झाली दोघांची भेट ? 

राजू हा पेशाने ऑटो ड्राईव्हर आणि टूरिस्ट गाईडच देखील काम पाहतो. तर केमिली ही 2019 साली कोविडच्या आधी भारतात हम्पी या ठिकाणाला भेट देण्यासाठी कुटूंबासोबत आली होती.यावेळी राजू आणि केमिलीची भेट झाली होती. यावेळी अनंत राजूने केमिलीला  शहरभर फिरवून इतिहासाशी निगडीत माहिती दिली होती. तसेच तिच्या राहण्यासाठी एका चांगल्या हॉटेलमध्ये व्यवस्थाही देखील केली होती. एकंदरीत काय तर अनंतने तिचा चांगला पाहुणचार केला होता. पर्यटनस्थळाची भेट झाल्यानंतर केमिली बेल्जियमला गेली होती.

हे ही वाचा : एकुलत्या एक मुलाचं लग्न ठरलं! वरातीऐवजी काढावी लागली अत्यंयात्रा, घटना वाचून धक्का बसेल

सोशल मीडियावरून होते संपर्कात

हम्पी फिरून झाल्यानंतर केमिली बेल्जियमला परतली होती. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांमध्ये हळूहळू मैत्री वाढत होती. साधाऱण तीन वर्ष ते एकमेकांच्या संपर्कात होते. यानंतर दोघांनी आपआपल्या कुटूंबियांकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. दोघांच्या कुटूंबियांकडून याला ग्रीन सिग्नल मिळाला होता. 

दोन्ही कुटूंबियांकडून होकार मिळाल्यानंतर केमिलीच कुटूंब भारतात आले होते. आणि भारतात विरुपाक्ष मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार दोघांच लग्न पार पडलं होते. या लग्नाचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. या लग्नाची एकच चर्चा आहे.