ADR Report | देशातील राजकीय पक्षांना कोणी किती देणग्या दिल्या? मोठा खुलासा

राजकीय पक्षांची आणि नेत्यांची माहिती ठेवणारी ADR संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे.

Updated: Jun 23, 2021, 07:30 PM IST
ADR Report | देशातील राजकीय पक्षांना कोणी किती देणग्या दिल्या? मोठा खुलासा title=

नवी दिल्ली : राजकीय पक्षांची आणि नेत्यांची माहिती ठेवणारी ADR संस्थेने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यात 2019 -20 मध्ये भाजपला 276 कोटींच्या देणग्या मिळाल्या होत्याय त्यानंतर कॉंग्रेसला सर्वाधिक म्हणजेच 58 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. 

Electoral trusts च्या टॉप देणगीदारांचा विचार केल्यास JSW Steel ने सर्वाधिक 39 कोटींची देणगी दिली आहे. त्यानंतर अपोलो टायरने 30 कोटी, इंडियाबुल इन्फ्रा 25 कोटी, देली इंटरनॅशनल एयरपोर्ट 25 कोटी,  DLF होम डेवलपर्स 16 कोटी,  MIG Bandra, JSW Energy, DLF ltd आणि Abil Infra यांनी 15-15 कोटींच्या देणग्या दिल्या आहेत. दहाव्या क्रमांकावर भारती एअरटेल आहे. एअरटेलने 12.25 कोटींची देणगी दिली आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 18 व्यक्तींनी इलेक्ट्रोरल ट्रस्टमध्ये देणगी दिली आहे. 

या देणग्यांमध्ये भाजपला 276.45 कोटी, कॉंग्रेसला 58 कोटी मिळाले आहेत. याशिवाय 12 अन्य राजकीय पक्षांना AAP, शिवसेना, युवा जन जागृती पार्टी, जननायक पार्टी, जेडीयु, जेएमएम, एलजेपी, एसएडी, आयएनएलडी, जेकेएनसी आणि आऱएलडी इत्यादींना 25 कोटींच्या देणग्या मिळाल्या. संपूर्ण वर्षात 362.91 कोटींच्या राजकीय देणग्या जमा झाल्या आहेत.