आधार हे ओळखपत्र आहे, प्रोफाईलिंग टूल नाही- UIDAI

: आधार कार्डवरील माहितीबद्दल असलेल्या सुरक्षिततेच्या मुद्द्याबद्दलची चिंता दूर करण्यासाठी UIDAI ने सांगितले.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 29, 2018, 12:48 PM IST
आधार हे ओळखपत्र आहे, प्रोफाईलिंग टूल नाही- UIDAI  title=

नवी दिल्ली : आधार कार्डवरील माहितीबद्दल असलेल्या सुरक्षिततेच्या मुद्द्याबद्दलची चिंता दूर करण्यासाठी आधार हे प्रोफायलिंग टूल नसून ओळखपत्र असल्याचे युनिक आयडेंटीफिकेशन ऑथारिटी ऑफ इंडियाने सांगितले.

ट्विटरवर लाईव्ह चॅट

युनिक आयडेंटीफिकेशन ऑथारिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी ट्विटरवर लाईव्ह चॅटदरम्यान सांगितले की, आधार आधार कार्ड हे कमीत कमी माहिती असते आणि बायोमेट्रीक्सवर अवलंबून असते. त्यामुळे असुरक्षितता तशी कमीच असते.

डिएनए घेण्याची काही योजना नाही 

डिएनए वर आधारित प्रश्नांवर पांडेय यांनी सांगितले की, आम्ही हाताचे ठसे, डोळ्यांचे निशाण आणि फोटो घेतो. डिएनए घेण्याची आमची काही योजना नाही आहे. फक्त या तीन गोष्टींवरच ओळख पटवली जाते. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती दुरूपयोग होण्याची शक्यता कमी आहे.

पांडेयने सांगितले की...

पांडेयने सांगितले की, जेव्हा तुम्ही बॅंकेत आधार नंबर देता, तेव्हा युनिक आयडेंटीफिकेशन ऑथारिटी ऑफ इंडियाला याबद्दल माहिती नसते. बॅंक तुमचा आधार नंबर आणि हातांचे ठसे चेक करण्यासाठी असे केले जाते. त्यातून सेवेसाठी त्यांना पुढची प्रक्रिया केली जाते.दीड तास सुरू असलेल्या प्रश्नोत्तरादरम्यान पांडेय यांनी २० हुन अधिक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याचबरोबर लोकांना असुरक्षित वाटून घाबरून जावू नये.