Viral Video: तरुणाचा बाईकने ट्रेनचं इंजिन खेचण्याचा प्रयत्न, पुढे अनपेक्षितच घडलं

Viral Video: ट्रॅकवर उभ्या ट्रेनसमोर एक तरुण धक्कादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. रील व्हायरल करण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या उद्देशाने त्याने केलेल्या या जीवघेण्या स्टंटची दखल पोलिसांनीही घेतली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 13, 2024, 01:20 PM IST
Viral Video: तरुणाचा बाईकने ट्रेनचं इंजिन खेचण्याचा प्रयत्न, पुढे अनपेक्षितच घडलं title=

Viral Video: शहरांपुरतं मर्यादित असलेली रील संस्कृती आता गावांमध्येही पोहोचली आहे. सहजपणे उपलब्ध होणारं इंटरनेट आणि सोशल मीडियाचं व्यसन यामुळे प्रत्येकजण रील करत असून आपणही प्रसिद्ध व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत. पण हे रील करताना अनेकदा आपण आपला जीव धोक्यात घालत असल्याचंही त्यांच्या लक्षात येत नाही. काही मोजक्या लाईक्स आणि शेअर्ससाठी हे तरुण धोक्याच्या पातळी ओलांडतात. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. उत्तर प्रदेशात ही घटना घडली असून येथे एक तरुण चक्क बाईकने ट्रेनचं इंजिन खेचण्याचा प्रयत्न करत आहे. ही ट्रेन ट्रॅकवर उभी असून तरुण तिला बाईकने ओढण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तरुण रेल्वे ट्रॅकवर धोकादायक स्टंट करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ तरुण दोरीच्या सहाय्याने ट्रेनचं इंजिन खेचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळी त्याने एक दोरी दुचाकीला बांधलेली होती. इंजिन ओढण्यासाठी तो बाईकला रेस देत होता. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याने किती धोका पत्करला होता याची कल्पना येते.

तरुण ज्या बाईकने स्टंट करत आहे तिचा रजिस्ट्रेशन नंबर नसल्याचं दिसत आहे. काही लाईक्स आणि सबस्क्रायबर्ससाठी तरुण धोका पत्करुन जीव धोक्यात टाकत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाने केलेल्या धोकादायक स्टंटची दखल घेतली. तरुणाची ओळख पटली असून विपिन कुमार असं त्याचं नाव आहे. तसंच तो देवबंद येथील माझोला गावाचा रहिवासी आहे. दरम्यान हा व्हिडीओ फार जुना असल्याचं समोर येत आहे. 

देवबंद-रुरकी रेल्वे लाईनवर ही घटना घडली आहे. याप्रकरणी मुझफ्फरनगर जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. हा स्टंट करताना तरुणाही काही जखमा झाल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे.