मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार

Love Marriage : प्रेम.... ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात. 

Updated: Nov 30, 2022, 01:09 PM IST
मुस्लीम पतीच्या छळाला कंटाळून रशियन तरुणीनं गाठला भारत; कृष्णभक्तीत तल्लिन असतानाच भेटला आयुष्यभराचा जोडीदार  title=
A Russian girl opposed to Krishna devotion and pressured for conversion leaves her Muslim husband and marries a Hindu boy

Love Marriage : प्रेम.... ही एक अशी भावना आहे जी अनेकांसाठी पूजनीय आहे. अतिशय निर्मळ आणि नि:स्वार्थ अशा या दुनियेत जेव्हा आपल्यावर एखाद्या व्यक्तीचं प्रेम (Love) आहे असं कळतं त्यावेळी मनाच असंख्य लहरी उठलेल्या असतात. नेमकं व्यक्त कसं व्हावं हेच कळत नसतं. प्रेमात पडलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत असं किमान एकदातरी घडलंच असेल. पण, प्रत्येकवेळी या प्रेमाची चांगलीच बाजू आपल्या नशीबी येईल असंही नाही. कारण, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तशीच प्रेमाचीही दुसरी बाजू आहे. (A Russian girl opposed to Krishna devotion and pressured for conversion leaves her Muslim husband and marries a Hindu boy)

हीच दुसरी बाजू अनुभवली एका रशियन महिलेनं. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच्याशीच त्या महिलेनं लग्न केलं. पण, धर्मांतरासाठी तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला आणि तिथंच या नात्याला आणि त्यांच्या प्रेमाला तडा गेला. स्वेतलाना ओचिलोवा असं या महिलेचं नाव. कृष्णभक्तीत तल्लिन असणाऱ्या असंख्य परदेशी नागरिकांपैकी तिसुद्धा एक. 

पतीला रुचली नाही कृष्णभक्ती 

स्वेतलाना ओचिलोवा हिनं ज्या मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं, त्यानं तिला प्रचंड विरोध केला. तिच्या प्रेमाचाच नव्हे तर तिच्या अध्यात्मिक धारणेचाही अनादर केला. कृष्णभक्तांना भेटणं तिच्या पतीला पटलं नाही. वाद विकोपास गेला आणि त्यानं तिला मारझोड करण्यास सुरुवात केली. धर्मांतरासाठी दबाव टाकत त्यानं तिचं जगणंही कठीण केलं. अखेर त्रासानं परिसीमा गाठली आणि तिनं पतीचं घर सोडून लहान मुलासोबत ती माहेरी परतली. 

भारत भेटीवर आली आणि... 

2016 पासून स्वेतलानानं स्वत:ला पूर्णपणे कृष्णभक्तीत वाहिलं. यादरम्यानच तिनं भारतातही भेट दिली होती. तिच्या वागण्याबोलण्यात प्रचंड बदल झाले. पुढे वर्षभरानंतर ती पतीशी बोलली. यावेळी तिच्यापुढे कृष्ण किंवा मी दोघांपैकी एकाला निवड असे पर्याय पतीनं ठेवले आणि तिथंच तिनं आपला मार्ग निवडला. तो म्हणजे कृष्णभक्तीचा.

हेसुद्धा पाहा : Viral Video : त्याने चक्क सिंहाला Kiss केली अन्...

 

... आणि पुढे एका नव्या प्रवासाची सुरुवात 

मायापूर येथे ती आपल्या मुलासह राहू लागली जिथं रोशन झा नावाच्या तरुणाशी तिची भेट झाली. कृष्णभक्ती हाच काय तो त्या दोघांमधील एक दुवा. पण, हा दुवाच इतका निर्मळ आणि पवित्र की त्याच बळावर त्यांचं नातं उभं राहिलं आणि नुकताच त्या दोघांनी साखरपुडाही केला. साक्ष होती ती म्हणजे वृंदावनातील यमुनातीराची. 

 

A Russian girl opposed to Krishna devotion and pressured for conversion leaves her Muslim husband and marries a Hindu boy

A Russian girl opposed to Krishna devotion and pressured for conversion leaves her Muslim husband and marries a Hindu boy

इन्स्टाग्राम पोस्टमधून एक सुरेख पोस्ट लिहित तिनं आपल्या आयुष्यातील या सुखद पर्वाची माहिती सर्वांनाच दिली. तिची ही पोस्ट म्हणजे अमर्याद सकारात्मकचेचं प्रतीकच आहे, हे कॅप्शन वाचताना सहज लक्षात येत आहे. 

भूतकाळाला जोडीदाराकडून स्वीकृती मिळाल्यानंतर आकारास येणारं एक नवं नातं कसं दिसतं हे तुम्हालाही पाहायचं असेल तर एकता या रशियन तरुणीची पोस्ट पाहाच.