Delhi Crime News: पाणीपुरीच्या वादात वृद्ध महिलेचा मृत्यू; दिल्लीतील विचित्र घटना चर्चेत

Panipuri Delhi Crime News: हल्लीच्या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. कोणाशी काय बोललो किंवा (Delhi Old Women Beaten after Refusing Panipuri) काय कृती केली आणि त्याता विपर्यास कसा होईल याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. तेव्हा अशावेळी आपल्याला कळत-नकळत काळजी घ्यावी लागते. सध्या गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे की त्यातूनही कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडेच (Crime news) खळबळ उडवून दिली आहे. 

Updated: Apr 7, 2023, 05:03 PM IST
Delhi Crime News: पाणीपुरीच्या वादात वृद्ध महिलेचा मृत्यू; दिल्लीतील विचित्र घटना चर्चेत title=

Panipuri Delhi Crime News: हल्ली गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यातून देशाच्या राजधानीतही (Delhi Crime) मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढताना दिसते आहे. श्रद्धा वालकर प्रकरण, कांझावाला प्रकरणानंतर (Latest Delhi Crime News) आता अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावेळी चक्क पाणीपुरीला नकार दिला म्हणून एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणात त्या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (a 68 year old women beaten up after refusing panipuri in shahdara delhi)

पाणीपुरीसारखा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो (Old Lady Beaten) आणि तो सगळीकडेच हमखास उपलब्ध असतो. परंतु काहींना पाणीपुरी खाणं पसंतही नसेल पण त्या व्यक्तीनं नाही म्हटलं तर त्या व्यक्तीला तुम्ही मारणार का? हो, असाच काहीसा प्रकार दिल्लीच्या शाहदारा भागात घडला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एक वृद्ध महिलेचा बळी गेला आहे.

कुठे घडली घटना? 

ही घटना दिल्लीच्या शाहादरा जिल्ह्यातील जीटीबी एक्लेव (GTB Enclave) या परिसरातील आहे. एका वयोवृद्ध महिलेनं पाणीपुरी खायला नकार दिल्यानं चक्क तिला मारण्यात आलं आहे. शेजारच्या महिलांसोबत या महिलेचा पाणीपुरी खाण्यावरून वाद झाला आणि याचे पर्यवसन चक्क त्या वयोवृद्ध महिलेला जीवेघेण्या मारपीटेपर्यंत गेले. यामध्ये ही महिला इतकी गंभीररीत्या जखमी झाली की तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले परंतु तिथेच तिचा मृत्यू झाला. या महिलेचे वय 68 इतके होते.  

यामध्ये या महिलेच्या सुनेनं पोलिसांकडे तक्रार केल्याचे कळते आहे. तिनं तक्रारीत सांगितले की तिची सासू ही दरवाज्यासमोर उभी होती. त्यानंतर तिच्या शेजारी राहणारी एक महिला पाणीपुरी(Panipuri) घेऊन आली परंतु तिच्या सासूनं पाणीपुरी खायला नकार दिला. मग त्या शेजारी महिलेच्या घरच्या बायका पण आल्या आणि मग त्यांनी या वृद्ध महिलेला मारहाण करायला सुरूवात केली. त्यांच्यात इतके जोरात भांडणं झाले की ते मारहाणीपर्यंत गेले. या महिलांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 

अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. 

सध्या महिलांमधील वादांचे प्रमाणा मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे कारण सध्या तिरस्कार आणि द्वेषाच्या भावनाही सगळ्यांमध्ये वाढताना दिसत आहेत. याआधी तरूण मुलींमध्ये मारहाणीच्या आणि भांडणाच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यातून असे व्हिडीओही सगळीकडे व्हायरल होताना दिसते आहेत.