7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 27, 2017, 11:31 PM IST
7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी title=

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने एक खुशखबर दिली आहे. ही खबर अशी की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा प्रतिनियुक्ती भत्ता (deputation allowance) दुप्पट केला आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने त्याबाबचा आदेशही नुकताच काढला आहे. 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता. आता नव्या धोरणानुसार तो आता 4500 इतका होणार आहे. मंत्रालयाने सातव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशिनुसार हा निर्णय घेतला आहे. 

सरकारी आदेशानुसार, एकाच जागी ही नियूक्ती असेल तर, हा भत्ता मुळ वेतनाच्या पाच टक्के असेन. जो 4500 पर्यंत असू शकतो. कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार जर कर्मचाऱ्याची नियुक्ती दुसऱ्या शहरात झाली तर, हा भत्ता त्याच्या मूळ वेतनाच्या 10 टक्के असणार आहे. ही रक्कम जास्तीत जास्त 9000 रूपये इतकी असू शकते.

दरम्यान, प्रतिनियुक्ती भत्ता हा स्थानिक शहरासाठी जास्तित जास्त 2000 तर बाहेरच्या शहरांसाठी जास्तीत जास्त 4000 इतका असू शकतो. सरकारी आदेशानुसार, महागाई भत्ता 50 टक्के वाढल्यामुळे हा भत्ता जास्तीत जास्त 25 टक्के इतका वाढवण्यात आला आहे.