बुखारींच्या मारेकऱ्यांचे रेखाचित्र जारी

मारेकऱ्यांना पकडण्य़ासाठी प्रय़त्नांना वेग

Updated: Jun 29, 2018, 05:15 PM IST
बुखारींच्या मारेकऱ्यांचे रेखाचित्र जारी title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधले पत्रकार शुजात बुखारींच्या मारेकऱ्यांना शोधण्याच्य़ा प्रयत्नांना वेग आला आहे. चार आरोपींची छायाचित्र पोलिसांनी जारी केली आहे. पाकिस्तानात कट रचून लष्कर ए तोयबान कट पूर्णत्वास नेल्याच पोलिसांनी सांगितलं आहे. पाकिस्तानात राहणारा दहशतवादी सज्जाद गुल यानं फरार दहशतवादी नवीद जट्टकरची हत्या केली. आझाद अहमद मलिक आणि मुजफ्फर अहमद भट्ट या स्थानिक दहशतवाद्यांचीही हत्तेसाठी मदत घेण्यात आली. श्रीनगरमध्ये लाल चौकाजवळच्या प्रेस एन्क्लेवमध्ये रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या केली. त्यांच्या २ सुरक्षारक्षकांचीही यावेळी हत्या करण्यात आली.