४ महिला सिंघम अधिकाऱ्यांची दमदार कामगिरी, कुख्यात गुंड जेरबंद

४ महिला पोलिसांनी दाखवलं शौर्य

Updated: May 6, 2019, 02:01 PM IST
४ महिला सिंघम अधिकाऱ्यांची दमदार कामगिरी, कुख्यात गुंड जेरबंद title=

अहमदाबाद : गुजरातच्या जुनागड आणि आजुबाजुच्या परिसरात ज्याची खूप दहशत होती त्या जुसब अल्लारख्खाला ४ महिला पोलिसांनी पकडलं आहे. जुसब अल्लारख्खा हा गँगस्टर आहे. १५ हून अधिक जणांची हत्या, लूट आणि खंडणीचा आरोप त्याच्यावर आहे. जुसब अल्लारख्खावर गुजरात पोलिसांच्या एका अधिकाऱ्यावर हल्ला करण्याचा देखील आरोप आहे. 

गुजरात पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या शोध घेत होते. जुसब अल्लारख्खा हा जंगलात फरार होत असे. लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून तो मोबाईल फोन कधीच सोबत ठेवत नव्हता. जंगलात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तो घोड्य़ावर बसून जायचा.

गुजरात एटीएसच्या टीमला माहिती मिळाली होती की, बोटादच्या जंगलात बेकायदेशीर गोष्ट सुरु आहे. त्यानंतर गुजरात ATS चे डीआयजी हिमांशु शुक्ला यांनी एक टीम बनवली. ज्यामध्ये ४ महिला इन्स्पेटर होते. शनिवारी उशिरा रात्री बोटादच्या जंगलात सर्च ऑपरेशन सुरु झालं. त्यानंतर महिला पोलिसांनी जुसब अल्लारखाला अटक केली. 

महिला पोलीस अधिकारी संतोक बेन, नितमिका गोहिल, अरुणा गामित आणि शकुंतला बेन यांनी हे ऑपरेशन केलं. ३ महिन्यापासून त्याला पकडण्याची तयारी सुरु होती. टीएस प्रमुख हिमांशु शुक्ला यांनी म्हटलं की, 'शौर्य दाखवण्यासाठी सगळ्यांनाच संधी मिळते. आम्ही महिला टीमवर विश्वास ठेवला आणि यश मिळालं.'