गुजरातमध्ये एक नाही दोन नाही तर इतके नरेंद्र मोदी...

आता गुजरात विधानसभा निवडणुकीची एक आगळीवेगळी बातमी....गुजरातमध्ये एक दोन नव्हे तर चक्क १५४ नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना?

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 1, 2017, 08:01 PM IST
 गुजरातमध्ये एक नाही दोन नाही तर इतके नरेंद्र मोदी... title=

अहमदाबाद : आता गुजरात विधानसभा निवडणुकीची एक आगळीवेगळी बातमी....गुजरातमध्ये एक दोन नव्हे तर चक्क १५४ नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत. ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना?

 पण हे खरंय...गुजरातमध्ये नरेंद्र मोदी नावाच्या तब्बल 154 मतदारांनी मतदार यादीत नोंद केलीय. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही नाव आहे. हे सर्व जण विधानसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत. 

पंतप्रधान मोदींचे नाव अहमदाबाद जिल्ह्यातील मतदार यादीत आहे. याच जिल्ह्यात नरेंद्र मोदी नावाचे सर्वाधिक मतदार आहेत. पंतप्रधानांसह याच नावाचे एकूण ४९ मतदार आहेत. 

मेहसाना जिल्ह्यातही नरेंद्र मोदी नावाचे २४ मतदार आहेत. भारुच जिल्ह्यात १६ आणि सूरतमध्ये १५, पाटन १३, बनासकांठा ११, सबरकांठा, गांधीनगर आणि बडोद्यात अनुक्रमे ७, ६ आणि ६ मतदार नरेंद्र मोदी या नावाने मतदान करणार आहेत.