सिरसा/चंदिगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम दोन साध्वींवर बलात्काराच्या प्रकरणात तुरुंगात कैदेत आहे. मात्र या डेरातील १० मुली अजूनही राम-रहिमचा हा डेरा सोडायला तयार नाहीत.
डेरा सच्चा सौदाच्या 'शाही बेटियां बसेरा'मध्ये १८ वर्षांहून जास्त वयाच्या १० तरुणींना डेरामधून शिफ्ट करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून झाला. सिरसाच्या डेऱ्यातून मंगळवारी अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. जिल्हा प्रशासन आता त्यांचे मेडिकल करणार आहे. बाबा राम रहीम रोज नव्या तरुणीसोबत अय्याशी करत होता, असं एका माजी डेरा समर्थकाने एका वाहिनी बोलताना म्हटलं आहे.
एसडीएम आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डॉ. गुरप्रीत कौर व कार्यक्रम अधिकारी डॉ. दर्शनासिंग बुधवारी दुपारनंतर डेरात पोहोचले. त्यांनी डेऱ्यातील शाही बेटियां बसेरामध्ये राहणाऱ्या सर्व मुलींना डेऱ्यातून स्थलांतरित करण्यासाठी डेराप्रबंधनचे प्रतिनिधी डॉ. नैन यांच्या उपस्थितीत समुपदेशन करण्यात आले. परंतु सर्व मुलींनी शिफ्ट होण्यास साफ नकार दिला. त्यांनी लेखी स्वरूपात एसडीएमला सांगितले की, त्यांना येथून शिफ्ट व्हायचे नाही. त्या डेराच्या शाही बेटियां बसेरामध्येच राहू इच्छितात.
आम्ही गेलो तेव्हा डेराच्या शाही बेटियां बसेराच्या सर्व मुलींना शिफ्ट करण्यासाठी फक्त एका मुलीला शिफ्ट केले जावे, जिचे वय 18 वर्षांहून कमी आहे. परंतु 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व 10 तरुणींनी डेऱ्यातून शिफ्ट होण्यासा स्पष्ट नकार दिला आणि लेखी स्वरूपात लिहून दिले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी डॉ. गुरप्रीत कौर यांनी सांगितलं.