World Sleep Day 2023 : झोप आपल्यासाठी किती महत्त्वाची? 'वर्ल्ड स्लिप डे'च्या निमित्तानं जाणून घ्या रंजक फॅक्ट्स...

World Sleep Day 2023: आपल्या आयुष्यात झोपेचे महत्त्व मोठे आहे. सकाळी आपली झोप नीट (Sleep and Health) झाली नाही अथवा आपल्याला झोपेचे आजार जडले तर आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उद्या म्हणजे 17 मार्च रोजी वर्ल्ड स्लिप डे (World Sleep Day) आहे, त्यानिमित्तानं जाणून घेऊया आपल्या आयुष्यात झोपेचे महत्त्व! 

Updated: Mar 16, 2023, 08:05 PM IST
World Sleep Day 2023 : झोप आपल्यासाठी किती महत्त्वाची? 'वर्ल्ड स्लिप डे'च्या निमित्तानं जाणून घ्या रंजक फॅक्ट्स... title=
world sleep day 2023 know the meaning and importance of world sleep day trending news in marathi

World Sleep Day 2023: सध्या आपल्या सर्वांचीच जीवनशैली ही बदलते आहे. त्यामुळे आपल्यालाही आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यातून ग्लोबलाझेशननंतर (Sleep and Its Importance) तर झोप हा विषय अधिक कळीचा मुद्दा झाला आहे. जेव्हा कॉपोरेटाझेशन वाढू लागलं आहे आणि ऑफिस कल्चर रूजू झालं आहे तेव्हापासून जास्त वेळ काम त्यातून प्रवास आणि ताण यामुळे आपल्या सर्वांच्याच झोपेवर विपरित परिणाम होताना दिसत आहेत. उद्या आपण सगळेच वर्ल्ड स्लिप डे (world sleep day theme) साजरा करणार आहोत. या दिवसाचे महत्त्व हेच आहे की लोकांना झोप आणि झोपच्या आरोग्याबद्दल जागरूक करणे हे आहे. या दिवसाचा हेतू हाच आहे की लोकांनी आपल्या झोपेविषयी अधिक जागरूक व्हावे. अपुरी झोप, इन्सोमेनिया, मानसिक ताण, टेंशन, आजार, कामाचा ताण आणि नातेसंंबंध यांमुळे लोकांचे आरोग्या बिघडू लागले आहे. (world sleep day 2023 know the meaning and importance of world sleep day trending news in marathi)

झोपेची काळजी कशी घ्याल? 

आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रथम आपल्या झोपकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दिवसागणिक तुमची चिडचिड (What are the symptoms of Sleep Deprivation) आणि अवस्थता वाढत असेल तर तुम्हाला अपुरी झोप मिळते आहे. डोळ्यावर ताण पडणे, डोकं दुखणे आणि दिवस प्रसन्न न जाणं हे प्रामुख्यानं अपुऱ्या झोपेची लक्षणं आहेत. तेव्हा अशा लक्षणांकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. तुम्हाला वेळेत झोपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही किती कामात बिझी असलात तरी तुम्हाला तुमच्या झोपेचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. 

तुम्हाला किती तासांची झोप आवश्यक आहे?

तरूणांमध्ये अपुऱ्या झोपेची समस्या वाढते आहे त्यामुळे त्यांनी आपल्या झोपेचे वेळापत्रक (Youth and Sleep Disorders) पाळणे आवश्यक आहे. त्यातून योग्य आहार करणेही आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणजे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदल्या आहेत. तेव्हा बाहरेचे जंकफूड खाण्याचे प्रमाण त्यानंतर अल्कोहोल आणि सिगारेटमुळेही शरीरावर परिणाम होता आहे त्यात एक म्हणजे याचा परिणाम जास्त करून झोपेवर होतो आहे. तेव्हा आहाराकडे विशेष लक्ष द्या. वयस्कर आणि प्रौढ लोकांमध्येही झोपेची समस्या वाढते आहे. त्यातून स्क्रिन एडिक्शनमुळेही (Screen Addiction) लहान मुलांच्याही आयुष्यात झोपेच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

'हे' तुम्हाला माहितीये का? 

तुम्हाला हे माहितीये का की, 15 टक्के लोकं हे झोपेत चालतात तर 5 टक्के लोकं ही झोपेत एकटेच बोलतात. आज काल अशी अनेक लोकं आहेत ती गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्ही (Guiness Book of World Records) मोडत आहेत. काहींनी जास्त वेळ झोपून तर काहींनी जास्त वेळ जागून विक्रम केलेले आहेत. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा आपली झोप ही कमी होते.