घरातील 'ही' कामं करूनही होईन तुमचं Fat Loss; जीमला जाऊन Workout ही नाही गरज

Best Workout Is Household Chores: आज आम्ही तुम्हाला असं एक वर्कआऊट सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही जीममध्ये न जाताही वर्कआऊट करू शकता. यामध्ये तुम्हाला घरातील काही काम करावी लागणार आहेत. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल. मात्र घरातील काम केल्याने देखील तुम्हाला प्रॉपर वर्कआऊटचा रिझल्ट मिळू शकणार आहे. 

Updated: Mar 16, 2023, 07:01 PM IST
घरातील 'ही' कामं करूनही होईन तुमचं Fat Loss; जीमला जाऊन Workout ही नाही गरज title=

Best Workout Is Household Chores: आजकाल बैठ्या जीवनशैलीमुळे (Sedentary lifestyle) अनेक आजार मागे लागतात. यासाठी आपल्याला एक्टिव्ह (Active) राहणं फार गरजेचं असतं. दरम्यान एक्टिव्ह राहिल्याने तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. वर्कआऊट केल्याने तुमच्या वजनाच्या समस्या दूर होऊ शकतात. बेली फॅट (Belly fat) कमी करण्यासाठी तसंच बारीक होण्यासाठी वर्कआऊट (Workout) फायदेशीर ठरतं. 

मात्र अनेकजण जीमला जाऊन वर्कआऊट करायला कंटाळा करतात. पण आज आम्ही तुम्हाला असं एक वर्कआऊट सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही जीममध्ये न जाताही वर्कआऊट करू शकता. यामध्ये तुम्हाला घरातील काही काम करावी लागणार आहेत. तुम्हाला आता आश्चर्य वाटेल. मात्र घरातील काम केल्याने देखील तुम्हाला प्रॉपर वर्कआऊटचा रिझल्ट मिळू शकणार आहे. पाहुयात यासाठी कोणती घरातील कामं करावी लागतील.

पीठ मळणं

अनेकांनी चपाती किंवा भाकरीचं पीठ मळायचा कंटाळा येतो. काहींना हे काम फार बोरिंग देखील वाटतं. मात्र हे तुमच्या फीटनेससाठी उपयुक्त ठरतं. पीठ मळल्याने हातांची एक्सरसाईज होण्यास मदत होते.

बागकाम

बागकाम करताना तुमचं कार्डियोवैस्कुलर एक्सरसाइज होते. यावेळी अधिक मेहनत घेतली तक तुमच्या शरीराचं संपूर्ण वर्कआऊट होण्यास मदत होते. हे काम करतेवेळी स्ट्रैचिंग, वेटलिफ्टिंग आपोपाप होऊन जातं. याशिवाय बागकाम करताना आपण चालतो, त्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.

हातांनी कपडे धुणं

ज्यावेळी तुम्ही हातांच्या सहाय्याने कपडे धुता, त्यावेळी तुमच्या शरीराचं पूर्णपणे वर्कआऊट होतं. यावेळी बादली उचताना तसंच कपडे धुताना हातांच्या होणाऱ्या हालचालींमुळे तुमचं एक्सरसाईज होते. यावेळी तुम्ही करत असलेल्या शारीरिक हालचालींमुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. 

लादी पुसणं

केर काढणं किंवा लादी पुसणं हे काम करायला अनेकांना आवडत नाही. पण हा एक अतिशय उपयुक्त व्यायाम आहे. लादी पुसणं हा पायांसाठी एक उत्तम व्यायाम मानला जातो. यासोबत हातांचीही एक्सरसाईज होते. या कामामुळे खास करून बेली फॅट कमी होण्यास मदत होते.