World Diabetes Day : मुंबईत एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस

Diabetes Day: आज वर्ल्ड डायबिटीस डे. (World Diabetes Day) त्यासंदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी. एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईत 2021 मधल्या एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस असल्याचं समोर आले आहे.  

Updated: Nov 14, 2022, 09:04 AM IST
World Diabetes Day : मुंबईत एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस title=

World Diabetes Day: आज वर्ल्ड डायबिटीस डे. (Diabetes Day) त्यासंदर्भातलीच एक महत्त्वाची बातमी. एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबईत 2021 मधल्या एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस असल्याचं समोर आले आहे. बीएमसीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक आकडेवारी आढळून आलीय. तसेच मुंबईत शालेय विद्यार्थ्यांना (Childrens day) डायबिटीस झाल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. वाढत्या डायबिटीस प्रकरणामुळे चिंता व्यक्त होत आहे. ( Diabetes Day: 14 pc deaths in Mumbai last year attributed to diabetes, says BMC)

विद्यार्थ्यांना धोका, पालक चिंतेत

 मुंबई महानगरपालिका (BMC) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (Diabetes ) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचवेळी मुंबईत 2021 मधल्या एकूण मृत्यूंपैकी 14 टक्के मृत्यूचं कारण डायबिटीस असल्याचे समोर आलेय. 18 ते 69 वयोगटातल्या 18 टक्के व्यक्तींमध्ये रक्तातल्या साखरेचं प्रमाण अधिक आढळलंय. राज्यात 3 वर्षांमध्ये डायबिटीसच्या पाच लाखांहून अधिक रुग्ण आढळून आलेत.  कोरोना संकटाच्या रक्तातील साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात काळात वाढलंय. (अधिक वाचा - अरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस)

मुंबईत धक्कादायक वास्तव पुढे

मुंबई (Mumbai) शहरातील 18 ते 69 या वयोगटातील सुमारे 18 टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर, राज्यात तीन वर्षांमध्ये मधुमेहाच्या पाच लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 2019-20 मध्ये असणारी 15 हजार 510 रुग्णसंख्या 2022च्या नोव्हेंबरपर्यंत 2 लाख 40 हजार 249 वर जाऊन पोहोचली. म्हणजेच राज्यातील मधुमेह रुग्णांची (Diabetes) संख्या जवळपास 10 पटींनी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण (World Diabetes Day) या संस्थेच्या 2021च्या अहवालानुसार जगातील प्रत्येक सात मधुमेही रुग्णांपैकी एक रुग्ण हा भारतीय आहे. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे.

पालकांचा सरकारी शाळांवरच विश्वास

 दरम्यान, कोरोना काळात पालकांनी सरकारी शाळांवर विश्वास दाखवल्याचं समोर आले आहे. (Mumbai School) कोरोना काळात दोन लाख विद्यार्थ्यांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतल्याची आकडेवारी समोर आलीय.(Childrens day)  तर दुसरीकडे खासगी शिक्षण संस्थांकडे मात्र पालकांनी पाठ फिरवल्याचं दिसले आहे. कोरोना काळात खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षणासह अनेक प्रयोग केले, त्याचा गाजावाजाही झाला. पण समोर आलेल्या आकडेवारीनुसार पालकांनी सरकारी शाळांवरच विश्वास दाखवलाय. 

कोरोनाची साथ ओसरल्यावर सरकारी  शाळांचा पट दोन लाखांपेक्षा अधिक वाढला आहे. मात्र, विद्यार्थीसंख्या वाढत असली तरी शासकीय शाळांमधील सुविधांचा विकास मात्र फारसा झाल्याचं दिसून आलेलं नाही, तिथल्या गैरसोयी अजूनही कायमच आहेत.