कोरोनाचा मुक्काम आणखी किती दिवस? WHO म्हणालं..

दरम्यान सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. मात्र अजूनही या व्हायरसचा धोका टळलेला नाही. 

Updated: Sep 15, 2021, 07:52 AM IST
कोरोनाचा मुक्काम आणखी किती दिवस? WHO म्हणालं.. title=

मुंबई : कोरोनाचा फटका संपूर्ण जगाला बसलेला आहे. भारताला देखील या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला दिसतोय. दरम्यान सध्या कोरोनाच्या प्रकरणांमध्ये आता घट होताना दिसतेय. मात्र अजूनही या व्हायरसचा धोका टळलेला नाही. मात्र कोरोनाचा धोका अजून किती दिवस असा प्रश्न मनात असताना जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठी गोष्ट सांगितली आहे.

WHOने वाढवली चिंता

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहिती काहीशी निराशाजनक आहे. डब्ल्यूएचओने असं म्हटले आहे की, कोरोनाला सध्या महामारीच्या श्रेणीत ठेवलं जाईल कारण व्हायरस कुठेही जाणार नाही. या निवेदनातून हे स्पष्ट झालं आहे की, सध्या जगाला निर्बंधांच्या छायेखाली राहणं आवश्यक आहे. कारण संसर्ग आणि त्याचे नवीन प्रकार जोखीम वाढवत असल्याचं दिसतंय. 

डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, जेव्हा जगभरातील अधिकाधिक लोकांना लस मिळेल आणि हर्ड इम्युनिटी मोठ्या प्रमाणावर विकसित होईल, तेव्हा कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या आपोआप कमी होईल. त्याचप्रमाणे लागण झालेल्या लोकांची संख्या देखील कमी होऊ लागेल. अशा परिस्थितीत आल्यानंतर कोरोनाला साथीच्या श्रेणीतून काढून टाकलं जाईल. 

भारतात लहान मुलांना कधी मिळणार वॅक्सिन?

कोरोना रोखण्यासाठी भारतात लसीकरण मोहीम अतिशय वेगाने सुरू आहे आणि देशातील 75 कोटीहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यासोबतच देशातील मुलांच्या लसीकरणाची तयारीही सुरू आहे आणि महिन्याच्या अखेरीस मुलांची लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.

Zydus Cadila's ची झायकोव्ह डीला देशात लहान मुलांच्या लसीसाठी मान्यता देण्यात आली आहे. ते सप्टेंबरच्या अखेरीस मुलांना लसीकरण करू शकतात. जर असं झालं, तर भारत अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा नंतर मुलांना लस देणारा चौथा देश असेल