Rose Cookies: हल्ली आपल्याला नाना प्रकारचे स्नॅक्स (Snakes( खायला आवडतात. त्यामुळे आपणही मग ते घरच्या घरी खाऊन पाहतो. आपल्याला तिथट आणि स्पायसी स्नॅक्सप्रमाणे गोड स्नॅक्सही आवडतात. त्यातीलच एक सध्या लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा स्नॅक म्हणजे रोझ कुकीज (Rose Cookies). हे रोझ कुकीज हल्ली सर्वांनाच आवडतात. ते चावायला थोडेसे कठीण असले तरी त्याची चवही अनेकांना आवडते. सणासुदीलाही हा पदार्थ खाल्ला जातो. ऑफिसमध्ये टाईमपास स्नॅक्स म्हणूनही याकडे पाहिले जाते. तुम्हाला माहितीये का की मोठमोठे सेलिब्रेटीही (Celebs) या स्नॅक्सकडे टेस्टी म्हणून त्यांच्या नाश्त्यालाही खातात. अभिनेत्री अनुष्का शर्मालाही हे रोझ कुकीज फार आवडतात. पण तुम्हाला माहितीये का तुम्ही हे रोज कुकीज घरच्या घरीही बनवू शकता. तुम्हाला याची रेसिपीही जाणून घ्यायला आवडेल. (what are these rose cookies and how make them know more)
हे रोझ कुकींग्ज बनवायला खूपच सोप्पे आणि स्वस्त आहेत. अनुष्का शर्माला (Anushka Sharma) हे कुकीज फार आवडता पदार्थ आहे. मध्यंतरी या स्नॅकबद्दल तिन तिच्या इन्टाग्रामवरूनही माहिती दिली होती. पण तुम्हाला हे जाण्याची उत्सुकता असेल की अल्पवधीतच सगळीकडे लोकप्रिय ठरलेला हा पदार्थ नक्की कसा तयार होतो. यात असं असतं तरी काय? मैदा, दूध, पांढरे तीळ, तांदळाचे पीठ आणि तूप अशा पदार्थांपासून हा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ गोड असतो. त्यामुळे अनेकदा दुपारच्या चहानंतर हा पदार्थ खाल्ला जातो. तर कधी ट्रॅव्हलिंग करतानाही हा पदार्थ खाल्ला जातो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या नातेवाईकांकडे अशा पदार्थ पाहिला असेल. लोकंही त्याचे हल्ली पॅकेट्स विकत घेतात.
हे कुकींग गोड आणि कुरकुरीत असतात त्यामुळे त्यांना तळले जाते. हे बनवायला फारसा वेळ लागत नाही तर काही मिनिटांतच ते तयार होतात. हे कुकीज बनवण्यासाठी मैदा 1 कप घ्या, त्यानंतर पीठ 1/4 कप, पांढरे तीळ 2 चमचे, गूळ 1/2 कप, व्हॅनिला एसेन्स 1 टीस्पून, तूप 2 टीस्पून , तेल आवश्यकतेनुसार (तळण्यासाठी), दूध 1 कप आणि बेकिंग पावडर 1 टीस्पून हे साहित्य घ्याव लागेल.
एका भांड्यात तांदळाचे पीठ चाळून घ्या. मग त्यात साखर किंवा पिठीसाखर घाला. यानंतर त्यात दूध मिसळा आणि पिठ नीट मिसळा. त्यात व्हॅनिला इसेन्स आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घाला. त्यानंतर हे पीठ किमान 10 ते 15 मिनिटे तसेच ठेवा. मंद आचेवर तवा ठेवा आणि मग तवा गरम करा. हे बनवलेले मिश्रण त्या तेला सोडा. खमंग भाजेपर्यंत ते तळून घ्या. त्यानंतर याला मिश्रणाला कूकीजचा आकार द्या आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)