Urine Control Side Effect : लघवी थांबवून ठेवाल तर 'या' आजारांना पडाल बळी, दिवसातून किती वेळा लघवीला जावं?

Symptoms Of Holding Urine : लघवी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून अनेक जण महिला असो किंवा पुरुष कामाचं कारण पुढे देऊन ती तासनतास नियंत्रित ठेवतात. पण याचा परिणाम त्यांचा शरीरावर होतो.   

नेहा चौधरी | Updated: Jun 15, 2024, 11:46 AM IST
Urine Control Side Effect : लघवी थांबवून ठेवाल तर 'या' आजारांना पडाल बळी, दिवसातून किती वेळा लघवीला जावं? title=
Urine Control Side Effect

Urine Holding Disease : लघवी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेक लोक कधी कामानिमित्त तर कधी प्रवासात असताना आपली लघवी तासनतास थांबवतात. तर काही लोकांना तर लघुवी थांबवणे ही एक सवयच असते. पण तुमची ही चूक तुम्हालाच महागात पडू शकते. कारण या सवयीमुळे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. शिवाय वारंवार लघवीला जाणेही हेदेखील चांगली नाही. तुमच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्यास त्याचा परिणाम शरीरात दिसून येतो. तुम्ही वारंवार लघवीवर नियंत्रण ठेवत असाल तर जाणून घ्या त्यामुळे काय नुकसान होते.

शरीरात दिसतात हे परिणाम !

शरीराचं तापमान वाढणं
खूप गरम किंवा खूप थंडी वाटणं
उलटीसारखं होणं
वारंवार लघवीला जावं लागणं
रात्रीसुद्धा लघवीला जाणं
लघवीला दुर्गंधी येणं
लघवीचा रंग फिकट किंवा हलका लाल होणे.

लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्यास हे होतात तोटे!

मूत्राशयाला लघवीची पिशवी असं म्हटलं जातं. तासनतास लघवी अडवून ठेवल्यास मूत्राशयावर ताण येऊ लागतो. अशा स्थितीत मूत्राशय फुटण्यासारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. त्यामुळे जास्त काळ लघवीवर नियंत्रण ठेवणे घातक ठरु शकतं. 

मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग

लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याची भीती निर्माण होते. या समस्येमध्ये लघवी करताना जळजळ आणि खाज सुटते. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. त्यामुळे काही झालं तरी लघुवी रोखून धरु नका. 

मूत्र गळती

लघवी थांबवण्याच्या सवयीमुळे अनेकांना वाढत्या वयाबरोबर लघवी गळतीची समस्या भेडसावते. कारण मूत्राशयाच्या कमकुवतपणामुळे मूत्र गळतीची समस्या निर्माण होते. 

मुतखडा

मूत्रात अ‍ॅसिड आणि कॅल्शियम ऑक्सलेट असतं. लघुवीवर बराच काळ नियंत्रण ठेवल्यास दगडांची समस्या निर्माण होते. लघवी रोखून ठेवण्याच्या तुमच्या सवयीमुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो, असं तज्ज्ञ सांगतात. 

दिवसातून किती वेळा लघवीला जावं? (how many times to go toilet)

दिवसभरात लघवीला जाण्याचं सामान्य प्रमाण हे 6-7 वेळा असायला पाहिजे. म्हणजेच 24 तासांत किमान 6-7 वेळा तरी लघवी करणं गरजेचं आहे, तज्ज्ञ सांगतात. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)