सेलिब्रिटींच्या फेव्हरेट बुलेटप्रुफ कॉफीचे चमत्कारीक फायदे पाहून व्हाल हैराण

वरण भात आणि तूप किंवा तूप, साखर आणि चपाती खायला अनेकांना आवडतं. पण तुम्हाला माहितेय का? कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्याने शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. 

Updated: Jun 15, 2024, 10:17 AM IST
सेलिब्रिटींच्या फेव्हरेट बुलेटप्रुफ कॉफीचे चमत्कारीक फायदे पाहून व्हाल हैराण title=

Bulletproof Coffee: कॉफी हे उत्साहवर्धक पेय आहे, प्रमाणाच्या बाहेर कॉफीचं सेवन केल्यास शरीराला हानी होऊ शकते असं तज्ज्ञांकडून सांगीतलं जातं. मात्र याच कॉफीचं सेवन योग्य प्रकारे केलं तर शरीराला कॉफी आरोग्यवर्धक ठरते. सेलिब्रिटींच्या फिटनेसबद्दल अनेकांना आकर्षण असतं. अनेक सेलिब्रिटी हे कॉफीमध्ये तूप टाकून पितात. तुपाच्या असंख्य फायदे आयुर्वेदात सांगीतले आहेत. तूप आणि कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात,याला बुलेटप्रुफ कॉफी असंही म्हणतात. बरेच सेलिब्रिटी याचा डाएटमध्ये समावेश करतात.  

मानसिक आरोग्य सुधारतं 
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना डिप्रेशन येतं. जर तुम्ही कॉफीमध्ये तूप टाकून प्यायल्यात तर तुमचं मानसिक आरोग्य सुधारतं. 

भुक नियंत्रणात राहते 
अवेळी लागणाऱ्या भुकेवर तूप आणि कॉफीचं सेवन करणं रामबाण उपाय म्हटला जातो. कॉफीमध्ये तूप टाकल्याने  भुकेवर नियंत्रण मिळवता येते. 

त्वचेसाठी फायदेशीर   
 तूप आणि कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे याचा फायदा त्वचेसाठी होतो. जर तुम्हाला फेशियल केल्यासारखा लुक हवा असेल तर, रोज तूप आणि कॉफीचा डाएटमध्ये समावेश करु शकता. 

पचनसंस्था सुधारते 
बाहेरच्या फास्टफूडमुळे बऱ्याचदा अ‍ॅसिडीटी आणि गॅसची समस्या होते.जर तुम्ही तूप आणि कॉफीचं सेवन केलं तर तुमची पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. 

वजन नियंत्रणात राहतं
वजन कमी कसं करावं या बऱ्याच जणांसमोर मोठा प्रश्न असतो. तूप आणि कॉफीच्या सेवनाने कॅलरीज झपाट्याने बर्न होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

हाडांसाठी फायदेशीर 
तुपातील पोषकत्वांमुळे हाडांना बळकटी मिळते. जर तुम्हाला संधावाताचा त्रास जाणवत असेल तर तूप आणि कॉफीचं सेवन आरोग्यदायी ठरतं.