Kitchen Hacks : ही खट्टी मिठी दाल वाढवेल तुमच्या आहारातील स्वाद

तर तुम्ही ही खट्टी मिठी दाल नक्कीच ट्राय करू शकता. 

Updated: Aug 20, 2022, 07:06 PM IST
Kitchen Hacks : ही खट्टी मिठी दाल वाढवेल तुमच्या आहारातील स्वाद  title=

Kitchen Hacks : आपल्याकडे विविध प्रकारच्या भाज्या, दाल, पराठे यांच्या अनेक रेसिपीज आहेत. त्यातून आपल्यालाही अनेक प्रकारच्या दाल या खायला आवडतात. जर तुमच्या स्वयंपाकघरात तूरदाळ असेल तर तुम्ही ही खट्टी मिठी दाल नक्कीच ट्राय करू शकता. 

बहुतेकांच्या घरात कडधान्यांचा आहारात समावेश असतो. त्यामुळे तुम्ही ही खट्टी मिठी दाल नक्कीच ट्राय करा. दालचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. त्यात आपली घरगुती फोडणीची असते त्यातून मसूराची असते. 

दालमध्ये तुम्हाला अनेक प्रकार पाहायला मिळतील. त्यातून आपल्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी चव आणि दाल बनवण्याची पद्धतही वेगळी असते. जर तुम्ही तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर या खिट्टी मिठ्ठी दालचा तुमच्या आहारात नक्कीच समावेश करा. 

खिट्टी मिठी दाल बनवण्याची रेसिपी -  

साहित्य -  तूरडाळ - अर्धी वाटी, 2 चमचे तेल, 1 कांदा बारीक चिरून, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 टीस्पून चिंचेचा कोळ, 1 टीस्पून साखर, मिरची पावडर, हळद, 7-8 कढीपत्ता, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, 1/2 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून मोहरी, 1 चिमूटभर हिंग, मूग डाळ - अर्धी वाटी

कृती - सर्व प्रथम तूर डाळ नीट धुवून घ्यावी.
 - इतर डाळींप्रमाणे ही डाळ कुकरमध्ये टाकून त्यात पाणी, हळद, मीठ, साखर आणि चिंचेचा कोळ घालून शिजवा.
- एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, हिरव्या मिरच्या आणि हिंग घाला.
- कांदा घालून हलका परता. नंतर सर्व मसाले मिक्स करा.
- मसाले मिक्स केल्यानंतर त्यात उकडलेली डाळ घाला. 
-15 मिनिटे शिजल्यानंतर तुमची खिट्टी मिठी दाल तयार आहे.