Healthy Foods Side Effects: 'हे' हेल्दी फूडसुद्धा ठरु शकतात आरोग्यास अनहेल्दी

त्यामुळे जर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी या हेल्दी पदार्थांचं जास्त सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा.

Updated: Aug 21, 2022, 04:02 PM IST
Healthy Foods Side Effects: 'हे' हेल्दी फूडसुद्धा ठरु शकतात आरोग्यास अनहेल्दी title=
trending news healthy fruits and vegetables excessive eating side effects in marathi

Healthy Foods Side Effects: निरोगी राहण्यासाठी आपण हेल्दी फूड खाण्यावर भर देतो. ताजी फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. पण तुम्हाला माहिती आहे,काही हेल्दी फूड तुमच्या आरोग्यासाठी अनहेल्दी ठरु शकतात. आपल्याला मोठी माणसं काय सांगतात की, एखाद्या गोष्टीचा अतिरेक वापर कधी चांगला नसतो. 

तसंच काही हेल्दी फळं आणि भाज्यांचं जास्त सेवन हे आपल्या शरीरासाठी घात असतात, असं प्रसिद्ध पोषक तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जर तुम्ही हेल्दी राहण्यासाठी या हेल्दी पदार्थांचं जास्त सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा. चला तर जाणून घेऊयात कुठले हेल्दी फूड ठरु शकतं अनहेल्दी. (trending news healthy fruits and vegetables excessive eating side effects in marathi)

हे हेल्दी फूड ठरु शकतात अनहेल्दी

1. संत्री (Orange)

संत्री ही आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. संत्र्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे संत्र्याचं सेवन जास्त केल्यास लघवीचा रंग बदलून केशरी होतो. तसंच तहान लागल्यावर कधीही संत्र्यांचा रस प्यायचा नाही. 

2. गाजर ( Carrot)

जमिनीच्या आत उगवणारी भाजी ही शरीरासाठी भरपूर पौष्टिक असतात. या भाज्या सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरुपात खाल्ल्या जातात. गाजरचं जर जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्वचेचा रंग पिवळा पडू शकतो. 

3. फुलकोबी (Cauliflower)

ही भाजी आरोग्यासाठी उत्तम असते. फुलकोबीमध्ये रिफनोज नावाचं घटक असतं. यामुळे तुमची पचनशक्ती कमी होऊ शकते. म्हणून फुलकोबी जास्त प्रमाणात खाऊ नये असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येतो. शिवाय फुलगोबी कधीही कच्ची खाऊ नये. 

4. मशरूम (Mushroom)

मशरुम हे महागडे खाद्यपदार्थ आहे पण ते आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. मशरुममधून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं. पण मशरुन जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटाचा विकार होऊ शकतो. त्याशिवाय जर मशरुम योग्य प्रमाणात शिजवले नाही, तर तुम्हाला अॅलर्जी होऊ शकते. 

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)