मुंबई : आरोग्याचा विचार करताना स्वच्छतेचा विचार होणे गरजेचे आहे. कारण स्वच्छतेतूनच पुढे आरोग्य घडेल. त्यामुळे सर्वप्रथम किचनची स्वच्छता हा मुद्दा लक्षात घेतला तर भांडी स्वच्छ असणे आवश्यक आहे. कारण त्यातच आपण अन्न शिजवतो, साठवतो. पाणी भरतो, पितो. पण अनेकदा मासांहारी पदार्थ बनवल्यानंतर भांड्यांना येणारा वास काही केल्या जात नाही. भांडी घासल्यानंतरहीत तो कायम राहतो. मग अशावेळी काय करावे? तर हे घरगुती उपाय नक्कीच भांड्यांना येणारा वास दूर करतील.
लिंबामुळे भांड्यांचा वास दूर होण्यास मदत होते. भांड्यांना येणारा माशांचा वास दूर करण्यासाठी लिंबाची साल भांड्यावर घासा आणि २० मिनिटे भांडे तसेच ठेवा. त्यानंतर भांडे धुवा.
व्हिनेगरमुळे भांड्यांचे डाग दूर होऊन भांडी चमकू लागतील. भांड्यांचा वास घालवण्यासाठी आधी भांडे साबणाने घासून स्वच्छ करा. त्यानंतर भांड्यात एक चमचा व्हिनेगर घालून ठेवून द्या. काही वेळाने पाण्याने भांडे धुवा.
भांड्यांना येणारा माशांचा वास दूर करण्यासाठी भांडी संत्र्याच्या सालीने घासा. ३० मिनिटांनंतर लिक्विड सोपने धुवा. वास दूर होईल.
मासे शिजवून झाल्यानंतर भांडे पाण्याने स्वच्छ करा आणि त्यानंतर सफरचंदाचे एक स्लाईस भांड्यावर घासा. यामुळे देखील भांड्यांना वास येणार नाही.
भांड्याचा वास दूर करण्यासाठी भांड्यात काही वेळ गरम पाणी घालून ठेवा. त्यानंतर लिक्विड सोपने घासा.