ब्रेकअप झाल्यानंतर मित्र/मैत्रिणींना चुकूनही या '५' गोष्टी बोलू नका!

प्रेमाचे नाते तुटण्यासारखे दुसरे दुःख नाही. 

Updated: Jul 14, 2018, 09:20 AM IST
ब्रेकअप झाल्यानंतर मित्र/मैत्रिणींना चुकूनही या '५' गोष्टी बोलू नका! title=

मुंबई : प्रेमाचे नाते तुटण्यासारखे दुसरे दुःख नाही. अशा प्रसंगी लोकांना आपल्या लोकांची साथ आणि आधाराची गरज असते. तुमच्याही आजूबाजूला अशी मंडळी असतील. तुम्ही जर तुमच्या ब्रेकअप झालेल्या फ्रेंडला मदत करु इच्छित असला तर चुकूनही त्याला/तिला या गोष्टी बोलू नका.

जे होतं ते चांगल्यासाठीच

हे खरे जरी असले तरी त्यावेळेस तिला किंवा त्याला हे वाक्य बोलू नका. ब्रेकअप झाल्यानंतर मनःस्थिती ठीक नसल्यामुळे कदाचित तुमच्या या वाक्याचा दुसराही अर्थ लावण्यात येईल. किंवा या परिस्थितीचा तुम्हाला आनंद होत आहे, असेही वाटू शकते.

तू तर स्ट्रॉंग आहेस

कोणी कितीही स्ट्रॉंग असले तरी ती वेळ फार नाजूक असते. त्यामुळे दुःख होणे, रडणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे हे असे बोलू नका. त्यांच्या भावनांचा निचरा झाल्यानंतर त्यांना त्यांच्या स्ट्रॉंगनेसची जाणीव करुन द्या.

तुझे वय तरी किती आहे.

नात्याचा शेवट हा आयुष्याचा शेवट नसतो. त्यामुळे ब्रेकअप झालेल्या मित्र-मैत्रिणीला धीर देताना त्यांच्याशी वय, रंग, पर्सनालिटी अशा गोष्टी बोलू नका. 

हे तर होणारच होते

असे बोलल्याने मित्र-मैत्रिणीला असे वाटेल की आतापर्यंत तुम्ही त्यांना चुकीच्या व्यक्तीसोबत राहून दिले. हे माहित असूनही की भविष्यात असे काही तरी होणार आहे.

मला तर तो/ती कधी आवडायचेच नाही

तुमच्या मनात तुमच्या ब्रेकअप झालेल्या फ्रेंडविषयी खूप प्रेम, आपुलकी असेल. पण भविष्यात पुन्हा कधी ते एकत्र आले तर? अशावेळी तुमच्या मैत्रीतील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता आहे.