मुंबई : सध्याच्या बीझी लाईफस्टाईलमध्ये आपण आपल्या आहाराची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकत नाही. चुकीच्या आहारामुळे अनेक समस्यांसोबत कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोकाही वाढतो. मात्र कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी तुम्ही आहारात हेल्दी बदल करू शकता. चला तर जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.
कोलेस्ट्रॉल वाढण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. यामध्ये तुम्ही आहारात ब्रोकोली, पालक आणि भेंडी यांसारख्या भाज्यांचा समावेश करू शकता. याचे इतर अनेक आरोग्य फायदे देखील देतात.
नियमित व्यायाम करणं प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं आहे. आपण खात असलेलं अन्न योग्य पद्धतीने पचणं गरजेचं आहे. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं. व्यायामामुळे तुम्हाला इतर अनेक आरोग्य समस्यांपासून संरक्षण मिळतं.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी चांगलं म्हणजेच हेल्दी कुकिंग ऑइल वापरा. स्वयंपाकाचं तेल वापरा जे एचडीएल म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास प्राधान्य देतं. सोयाबीन तेल, तीळ तेल, जवस तेल आणि ऑलिव्ह तेल अशा तेलाचा वापरू शकता. मात्र तरीही तेलाचा वापर प्रमाणात करावा.