मुंबई : मुंबईकरांचं आयुष्य अगदी घड्याळाच्या काटेप्रमाणे धावत असतं. मात्र आता हेच मुंबईकर तणावाखाली आल्याचं समोर आलंय. मुंबई महापालिकेकडून एक सर्व्हेक्षण करण्यात आलं होतं. या सर्व्हेक्षणानुसार, 34 टक्के मुंबईकर तणावाखाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई महापालिकेने पाच हजार जणांचे स्टेप सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणाच्या माध्यामातून 34 टक्के मुंबईकर हायपर टेन्शनचे शिकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईकरांची सततची धावपळ, अवेळी खाणं आणि जंकफूड अशा अनेक कारणांमुळे तब्बल 34 टक्के मुंबईकरांमध्ये हायपर टेन्शनमध्ये आहेत.
दरम्यान, हायपर टेन्शन, अर्थात मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी आशा वर्कर्स आणि सीएचव्ही वर्कर्स घरोघरी जाऊन समुपदेशन, ब्लड प्रेशरची तपासणी करणार असून, औषधोपचार करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिलीये.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार महापालिकेने पाच हजार जणांमध्ये हे स्टेप सर्वेक्षण केलं. त्यामुळे मुंबईकरांचा तणाव कमी करण्यासाठी मुंबईतील घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार असून त्यांना औषधंही दिली जाणार आहेत.
दरम्यान या घरोघरी जाऊन केलेल्या जाणाऱ्या तपासणीत ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त आढळल्यास त्यांना पालिकेच्या रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मोहिमेत रुग्णावर केलेल्या उपचारांच्या परिणामांचा आढावा घरोघरी जाऊन घेण्यात येणारे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येणारे.