'या' लक्षणांवरुन ओळखा शरीरातील कॅल्शियमची कमतरता!

हाडे, सांध्यांच्या बळकटीसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते. 

Updated: Jul 7, 2018, 11:19 AM IST
'या' लक्षणांवरुन ओळखा शरीरातील कॅल्शियमची कमतरता! title=

मुंबई : हाडे, सांध्यांच्या बळकटीसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते. त्याचबरोबर दात मजबूत होण्यासाठी देखील कॅल्शियमची आवश्यकता असते. तसंच कॅल्शियममुळे पेशी मजबूत होतात. रक्तसंचार सुरळीत होण्यात आणि मधुमेहाला आळा घालण्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका निभावतो.

अनेकजण कॅल्शियमची कमतरता जाणवू लागल्यावर कॅल्शियमयुक्त आहार किंवा सप्लीमेंट्स घेण्यास सुरुवात करतात. पण त्यासंबंधित पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया कॅल्शियमची कमतरता नेमकी कशी ओळखावी...

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू आखडल्यासारखे वाटतात आणि दुखू लागतात. इतकंच नाही तर थकल्यासारखेही वाटते. थोडेसे काम केल्यावरही थकवा जाणवत असेल तर शरीरात कशाची तरी कमतरता आहे, हे जाणावे.
  • कमजोर दात, नखं, केसांचे तुटणे, गळणे, कंबर दुखणे ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत.
  • झोप न येणे, भीती वाटणे, टेन्शन येणे ही देखील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकते. 

नोट-

शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवताच डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतेही सप्लीमेंट्स किंवा औषधे घेऊ नका. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी डॉक्टरांचा सल्लाच कामी येईल. हिरव्या पालेभाज्या, दही, बदाम, पनीर हे कॅल्शियमचे प्रमुख स्त्रोत आहेत.