सावधान! लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही...मग तुम्हाला हा फोबिया असू शकतो पण उपायही सांगतोय

सोशल फोबिया असलेल्या लोकांना इतर लोकांशी बोलणं किंवा इतरांमध्ये मिसळणं आवडत नाही.

Updated: Jun 5, 2021, 07:08 PM IST
सावधान! लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही...मग तुम्हाला हा फोबिया असू शकतो पण उपायही सांगतोय title=

मुंबई : काही लोकांचा स्वभाव वेगळा असतो आणि अशा लोकांना इतर लोकांशी बोलणं किंवा त्यांच्यामध्ये मिसळणं आवडत नाही. अशी लोकं बहुतांश वेळा एकटं राहणं पसंत करतात. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, ही देखील एक मानसिक समस्या असू शकते. सोशल फोबिया असलेल्या लोकांना इतर लोकांशी बोलणं किंवा इतरांमध्ये मिसळणं आवडत नाही.

यासंदर्भात माहिती देताना नांदेडमधील कंसल्टंट सायकॅट्रिस्ट डॉ. प्रणद जोशी म्हणाले, "जगभरातील साधारण ६-७% लोकांना  social anxiety disrder हा आजार असतो. कोणीचरी चिडवेल, छळेल किंवा त्रास देईल यामुळे वाटणारी भिती किंवा चिंता हे सोशल फोबियाचं प्रमुख लक्षण आहे. अशा व्यक्ती ज्या ठिकाणी त्यांच्या चिंतेत भर पडेल किंवा भिती वाटेल अशा ठिकाणी जाणं टाळतात." 

डॉ. जोशी पुढे म्हणाले "या लोकांना वाटणारी चिंता ही वस्तुस्थितीपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. तसंच ही चिंता त्यांच्या दैनंदिन जीवनावर फार परिणाम करते. योग्य औषधोपचार किंवा समुपदेशन यांच्यामार्फत सोशल फोबियावर मात करणं शक्य आहे." 

ज्या व्यक्तीला सोशल फोबिया म्हणजे सोशल एनक्झायटी डिसॉर्डरची समस्या असते त्यांना घराबाहेर जाणं तसंच लोकांशी बोलणं कठीण होऊन जातंय. जाणून घेऊया सोशल फोबियामध्ये कोणकोणती लक्षणं दिसून येतात. 

शारीरिक लक्षणं

हृदयाचे ठोके जलद होणं

घाम येणं

थरथरणं

पोटात गोळा येणं

भिती वाटणं

चक्कर येणं

डोकं गरगरणं

भावनात्मक आणि स्वभावाशी निगडीत लक्षणं

अनोळखी लोकांशी बोलण्यास भीती वाटणं

आपल्याबाबत दुसऱ्यांची काय मत असतील याची भीची वाटणं.

सोशल फोबियाची शारीरिक लक्षणं इतरांच्या लक्षात येतील याची भीती वाटणं

लोकांमध्ये असल्यावर सतत चिंताजनक असणं

आकर्षणाचा केंद्रबिंदू बनल्यावर खूप भीती वाटणं