मुंबई : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढा देतोय. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर कोरोनातून मुक्त झालेल्या रूग्णांमध्ये पोस्ट कोविडची लक्षणं दिसण्याचं प्रमाणंही वाढलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही लक्षणं कोरोनातून बरं झाल्यानंतर एका महिन्याने दिसतात. दरम्यान पोस्ट कोविडच्या लक्षणांमध्येही अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलंय.
सँडोर्फ युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनद्वारे केलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनामुळे मध्यम ते गंभीर प्रकारच्या रूग्णांमध्ये 70 टक्के रूग्णांना रिकव्हरीनंतर एका महिन्याने विविध लक्षणं दिसून आली. संशोधनानुसार, कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी ही लक्षणं रूग्णांमध्ये दिसून येऊ शकतात. तसंच ही लक्षणं कोरोनाच्या लक्षणांसारखीच असतात.
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशनच्या मताप्रमाणे, पोस्ट कोविडच्या लक्षणांमध्ये व्यक्तीला शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. रूग्ण कोरोनातून मुक्त झाला की काही आठवड्यांनी ही लक्षणं दिसून येतात.
1. ब्रेन फॉग म्हणजेच कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्याची समस्या
2. डोकेदुखी
3.थकवा
4. उभं राहिल्यावर चक्कर येणं
5. छातीत दुखणं
6.श्वास घेताना त्रास होणं
7.खोकला
8.स्नायू दुखणं
9.ताप
10.वास आणि चवीची क्षमता बदलणं