बदामाचे Side Effects तुम्हाला माहित आहेत का? 'या' लोकांनी कधीही बदाम खाऊ नये

कोणत्या लोकांना बदाम खाणे धोक्याचे असू शकते जाणून घ्या

Updated: Aug 11, 2021, 07:22 PM IST
बदामाचे Side Effects  तुम्हाला माहित आहेत का? 'या' लोकांनी कधीही बदाम खाऊ नये title=

मुंबई : बदाम हे शरीरासाठी आणि मेंदूसाठी चांगले असल्याचे मानले जाते. परंतु प्रत्यक वस्तुचे जसे फायदे असतात तसे त्याचे तोटे देखील असतात. त्याचप्रमाणे बदामचे देखील काही वाईट परिणाम समोर आले आहेत. त्यामुळे काही व्यक्तींसाठी बदाम खाणे धोकादायक असल्याचे सांगितले जाते.

कोणत्या लोकांना बदाम खाणे धोक्याचे असू शकते जाणून घ्या

1. जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण (brlood pressure) असाल आणि त्यासाठी दररोज औषध घेत असाल, तर तुम्ही बदामाचे सेवन करणे थांबवावे. कारण औषधांसह बदामाचे सेवन हानिकारक ठरू शकते.

कारण बदामांमध्ये मॅंगनीज मुबलक प्रमाणात आढळते. त्याचा अतिरेक केल्यास रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

2. ज्या लोकांना मायग्रेनची समस्या आहे त्यांनी देखील बदाम खाणे टाळावे. बदाममध्ये व्हिटॅमिन ई आढळते. व्हिटॅमिन ई च्या जास्त प्रमाणामुळे डोकेदुखी, थकवा आणि चक्कर येते. म्हणूनच, मायग्रेनच्या रुग्णांनी त्याचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात करावा किंवा करू नये.

3. ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे, त्यांनी बदामाचे सेवन टाळावे. खरं तर, किडनी स्टोनच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांना ते पदार्थ खाण्यास मनाई आहे, ज्यात ऑक्झलेट आहे. बदामांमध्ये ऑक्सलेट देखील आढळते, अशा परिस्थितीत बदाम खाल्याने किडनी स्टोनची समस्या वाढू शकते.

4. ज्या लोकांची पचनसंस्था कमकुवत आहे, त्यांनीही बदाम खाणे टाळावे. बदामामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, तसेच ते खूप गरम असते. अशा स्थितीत गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात जळजळ इत्यादी त्रास उद्भवू शकतात.

5. जर तुमचे वजन जास्त असेल आणि तुम्हाला ते कमी करायचे असेल तर तुम्ही बदामाचे सेवन करू नये. बदामामध्ये कॅलरी आणि चरबी जास्त असतात, ज्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो. अशा परिस्थितीत, त्याचा वापर टाळा किंवा शारीरिक व्यायामावर भर द्यावी जेणे करुन अतिरिक्त कॅलरी बर्न होतील.