Side Effect Curd : या 5 गोष्टींना कधीही दहीसोबत खाऊ नये, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते

Side Effect Curd : बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला त्याचे परिणाम दीर्घ काळानंतर रोगाच्या रूपात दिसतात.

Updated: Jan 21, 2022, 02:00 PM IST
Side Effect Curd : या 5 गोष्टींना कधीही दहीसोबत खाऊ नये, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते title=

मुंबई : दही हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. बहुतेक तज्ञ दुपारच्या जेवणात दही समाविष्ट करण्याबद्दल बोलतात. ज्याचा फायदा आपल्या शरीराला होईल. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, की जसे दुधाला काही पदार्थांसोबत खाल्ले जात नाही. तसे दहीचे देखील आहे. दही हा दुधाचाच एक प्रकार असल्यामुळे तो काही पदार्थांसोबत खाऊ नये असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. जर तुम्ही या पदार्थाला दहीसोबत खाल्ले तर, यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकतं.

यामुळे पोटदुखी, पोट खराब, उलट्या, मळमळ, जुलाब इत्यादी समस्या होऊ शकतात. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला त्याचे परिणाम दीर्घ काळानंतर रोगाच्या रूपात दिसतात. त्यामुळे विरुद्ध आहार एकत्र खाऊ नये. त्या पाच गोष्टींबद्दल जाणून घ्या ज्या दह्यासोबत कधीही खाऊ नये.

दूध आणि दही

दही आंबट झाल्यावर बरेच लोक त्यात दूध मिसळून सेवन करतात, जे पूर्णपणे चुकीचे आहे. दही नक्कीच दुधापासून बनते, पण या प्रक्रियेत त्याचा परिणाम आणि प्रकृती बदलते. त्यामुळे दूध आणि दही एकत्र सेवन करत नाही. यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

दही आणि कांदा

बरेच लोक दही आणि कांदा एकत्र खातात. काही लोक कांदा रायता बनवून खातात. पण दही आणि कांदा हे मिश्रण आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जात नाही. हे खाल्ल्याने तुम्हाला अॅलर्जी, उलट्या, गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या होऊ शकतात.

आंबा आणि दही

आंबा आणि दही एकत्र सेवन करू नये. आंब्याचा स्वभाव उष्ण आहे आणि दही थंड आहे. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुमच्या शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. अशा परिस्थितीत अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

तळलेल्या गोष्टींसोबत दही

बरेच लोक पकोडे आणि पराठ्यासोबत दही खातात. तर दही या गोष्टी पचण्यास समस्या निर्माण करते. त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि दह्याचे पोषक तत्वही शरीराला मिळत नाहीत.

दही आणि मासे

जे मासे खातात त्यांनी यासोबत दही खाणं टाळावं. मासे आणि दही एकत्र खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. तुम्हाला अपचन, गॅस, पोटदुखी, उलट्या अशा अनेक समस्या असू शकतात.