Fack Chek : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

थंडीच्या दिवसात हार्ट अटॅकचा धोका वाढतो असा दावा करण्यात आला आहे, पण या दाव्यात किती तथ्य आहे, काय आहे व्हायरल दाव्यामागचं सत्य

Updated: Dec 30, 2022, 09:54 PM IST
Fack Chek : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? title=

Viral News : हिवाळ्यात (Winter) हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका अधिक असतो असा दावा करण्यात आला आहे. पहाटे थंडी जास्त असल्यास रक्तवाहिन्या (Blood Vessels) आकुंचन पावतात आणि त्यामुळे अटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ होते. हा दावा केल्यानं हार्ट रुग्णांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती हार्ट स्पेशालिस्ट देऊ शकतात. त्यामुळे याची अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात...
थंडीत हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो
रक्तवाहिनी बंद होऊन हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकची शक्यता
हिवाळ्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात
ब्लॉक असलेल्या रुग्णांनी थंडीत काळजी घ्यायला हवी
धुम्रपान, मद्यपान करू नये

थंडीत हार्ट रुग्णांनी अधिक काळजी घ्यायला हवी. तळलेले पदार्थही जास्त खाऊ नये. हार्ट रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थंडीत रक्तवाहिनी अकुंचन पावत असल्याने हार्ट अॅटॅक येऊ शकतो हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरला. 

थंडीत काय काळजी घ्याल
थंडीच्या दिवसांत हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे, रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे, शरीरातील अतिरिक्त चरबी, कोलेस्टेरॉलची वाढ यांच प्रमाण वाढतं. पण जीवनशैलीतील काही गोष्टींवर नियंत्रण आणल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

1 - अतिप्रमाणात अल्कहोल घेण्याची किंवा धूम्रपान करण्याची सवय असेल तर त्यावर नियंत्रण आणा

2 - शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा, सतत ताण घेतल्याने हृदयाच्या धमन्यांना सूज येते त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात परिणामी हार्ट अटॅकची शक्यता वाढते. ताण कमी करण्यासाठी वाचन, गाणी, फिरणं अशा मन रमवा

3 -  अपुरी झोपही हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं, त्यामुळे रात्रीच्या वेळी 7 ते 8 तासांची झोपं आवश्यक आहे. व्यवस्थित झोपेमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

4 - रोजच्या आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. आहारात मीठ, साखर आवश्यक त्या प्रमाणातच वापरा. आहारात जास्त मीट वापरल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, तर साखरेमुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. या दोन्ही गोष्टी हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू शकतात.

5 -  आपल्या व्यस्त वेळापत्रकातून दररोज किमान 30 मिनटं व्यायाम करा, पण थंडीच्या दिवसात पहाटे किंवा रात्रीच्या गारठ्यात व्यायाम करणं शक्यतो टाळा