Relationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...

Never Fall in These 5 Types of Men: आपल्याला आपल्या आयुष्यात रिलेशनशिपचे विविध अनुभव येताना दिसतात. परंतु जर का आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलो असू तर आपल्यालाही त्या व्यक्तीचा सहवास हा नकोसो वाटतो त्यामुळे तरूणींना 'या' पाच पुरूषांच्या प्रेमात अजिबातच पडू नये. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 13, 2023, 11:48 AM IST
Relationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...  title=
August 13, 2023 | relationship tips 5 types of men you should never fall in love with

Never Fall in These 5 Types of Men: आपल्या आयुष्यात अनेकदा रिलेशनशिपमध्ये असताना अनेक विविध अनुभवांना समाेरे जावे लागते. आपण एका व्यक्तीच्या संपुर्ण प्रेमात बुडालेले असतो. त्यातून आपण त्या व्यक्तीसाठी ते सर्व करतो ज्याची अपेक्षाही आपण त्या व्यक्तीकडून करतो. खासकरून अनेकदा आपण पाहतो की मुली या फारच संवेदनशील आणि सोशिक असतात. सोबतच आपल्या पार्टनरसाठी त्या त्या हरएक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात ज्या गरजेच्या आहेत. परंतु अनेकदा त्यांच्या पार्टनर त्या गोष्टी त्यांना परत मिळत नाही. त्या फक्त अपेक्षाच करतात. परंतु त्या त्यांच्या पार्टनरकडून पुर्ण होताना दिसत नाहीत. तेव्हा अनेकांच्या मनात हा विचार येतो की आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात तर पडलो नाही? ही धास्ती खरी ठरून आपलं रिलेशनशिप हे खराबही होऊ शकतं. आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो आहोत हे कसं ओळखायचं? या जगात 5 प्रकारचे पुरूष असतात ज्यांचा प्रेमात पडल्यानं तुमचे नुकसानही होऊ शकते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया 

तेव्हा अशावेळी काही टीप्स लक्षात ठेवणं हे फारच महत्त्वाचे असते. एकतर मैत्री आणि प्रेम यातील पुसट रेषा आपल्याला कळायला हवी. ज्या पुरूषाशी आपण मैत्री केली आहे त्याच्या आपल्या काही सवयी खटकत असतील तर त्या व्यक्तीशी संगत कदाचित तुमच्यासाठी योग्य ठरू शकणार नाही. त्यातून तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडताय, त्या व्यक्ती 'हे' पाच दुर्गुण नसतील तर तुम्हाला त्या व्यक्तीची संगत पडणे काही नुकसानीचे होणार नाही. तेव्हा यावेळी जाणून घेऊया की या 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात का पडू नये आणि हे पाच पद्धतीचे पुरूष नेमके कोण?

हेही वाचा - ठरल्यापेक्षा अधिक मानधन, लग्नाआधीच गरोदर, मंदिरात लग्न अन्...; श्रीदेवी-बोनी कपूर यांची रिअल लाइफ फिल्मी Love Story

1. सतत कामात वग्र आणि आत्ममग्न
- जर तुमचा पार्टनर हा सतत कामात व्यस्त असेल आणि तुम्हाला योग्य तो मान आणि वेळ देत नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी जे काही करताय ते फार काही फळाला येणार नाही. त्यातून तो आत्ममग्न असेल आणि तुमच्याकडे लक्षही देत नसेल तर तुमच्या रिलेशनशिपला काहीच अर्थ राहत नाही. 

2. हुकुमशाही पद्धतीचा किंवा अधिकार गाजवणाऱ्या वृत्तीचा
- तुम्ही अशा एका पुरूषाच्या प्रेमात पडला आहात जो तुमच्यावर हुकूमशाही गाजवण्याचा प्रयत्न करतो अथवा तुमच्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो तर वेळीच सावध व्हा. त्यातून अशावेळी तुमच्या नात्यानं वाद आणि भांडणंही होऊ शकतात. तुमच्या नात्यात जर का स्वातंत्र्य नसेल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेले आहात. 

3. मुडी असणारा, चंचल स्वभावाचा
- आपल्या प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा आहे. त्यामुळे अनेकांचे मूड स्विंग्सही होताना दिसतात. त्यामुळे अशावेळी एखाद्या व्यक्तीशी संवाद साधणंही फार कठीण होऊन जाते. त्यातून चंचल स्वभावाच्या पुरूषाच्या प्रेमात पडणेही धोकादायक ठरते. 

4. प्ले बॉय 
- तुम्ही ज्या पुरूषाच्या प्रेमात पडला आहात तो जर का प्ले बॉय, मुलींना वस्तू प्रमाणे वापरणारा, त्यांच्या भावनांशी खेळणारा असा असेल तर तुम्हाला वेळीच सावध होणे आवश्यक आहे. प्ले बॉय आणि स्त्रीलपंट पुरूषाच्या प्रेमाच पडून तुम्ही तुमचे नुकसान करू घेऊ नये. 

5. स्वार्थीवृत्तीचा 
- ज्या व्यक्तीच्या प्रेमात तुम्ही पडलेले आहात तो फारच स्वार्थीवृत्तीचा असेल तर त्या व्यकीच्या प्रेमात पडू नये. त्यातून तुम्हाला ज्यात त्रासच होण्याची शक्यता असते. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)