Weight Loss tips : झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात करा 'हे' बदल!

Weight Loss tips : वजन कमी होत नाही अशी प्रत्येकाची तक्रार असते. अनेक उपाय करुन देखील वजन कमी होत नाही. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी  नक्की वाचा... 

Updated: Feb 2, 2024, 05:30 PM IST
Weight Loss tips : झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात करा 'हे' बदल! title=

Weight Loss tips News In Marathi : सध्याच्या धावपळीच्या जीवनात योग्य आहार मिळत नसल्यामुळे बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागते. अशावेळी शरीराचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात प्रथिने मिळणे आवश्यक आहे.  आहारातील योग्य प्रमाणात मिळणाऱ्या प्रथिनांमुळे शरीराला ऊर्जा मिळते. स्नायू , हाडे,  श्वसनसंस्था आणि हृदयाच्या आरोग्यासाठी प्रथिने फायदेशीर ठरतात. अनेकदा आपल्याला रोजच्या आहारातून प्रथिने मिळत असतात, पण त्याची योग्य मात्रा आपल्याला माहित नसते. जर तुम्हालाही वजन कमी करायचं असेल तर जाणून घ्या या सोप्या टिप्स...

प्रथिने शरीरासाठी फायदेशीर असले तरी त्यांची योग्य मात्रा कळणे आवश्यक आहे. दूध.अंडी, मासे आणि मांसाहारी पदार्थांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात मिळत असतात. त्याशिवाय सोयाबीन आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रथिन्यांची मात्रा मुबलक प्रमाणात असते. मात्र प्रथिनांच्या अतिसेवनामुळे मुत्राशयासंबंधीत आजार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

आहारात प्रथिने कसे निवडावे?

अतिरिक्त सोडीयम असलेले पदार्थ किंवा प्रक्रीया केलेले मांस यांच्या सेवनाने गरजेपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने मिळत असल्याने अनेक मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. चिकन,दूध.अंडी, मासे यांच्या सेवनाने आहारातील प्रथिन्यांची मात्रा संतुलित राहते.

मासांहारीसह शाकाहरी  पदार्थांमध्ये प्रथिने

मांसाहारी पदार्थांप्रमाणे शाकाहारी पदार्थांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात मिळतात. सोयाबीन, कडधान्ये,मटार, हिरव्या पालेभाज्या यांच्यात हे प्रथिनेयुक्त पदार्थ शरीराच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतात.  

तसेच प्रोस्टेड कार्बोहायड्रेड आणि प्रथिने यांचे आहारात योग्य संतुलन राखल्याने रक्तप्रवाह सुरळीत राहतो. त्यामुळे हृदयासंबंधीत आरोग्य सुधारते. त्याचबरोबर झटपट वजन कमी करण्याकरीता जास्त प्रमाणात प्रथिने सेवन केल्याने आरोग्याचे नुकसान होते. पुरुषांसाठी दररोज 56 ग्रॅम आणि स्त्रियांसाठी 46 ग्रॅम प्रथिने मिळणे आवश्यक आहे.

फक्त आहाराच नाही तर योग्य व्यायामाने वजन कमी होण्यास मदत होते. प्रथिन्यांचे सेवन करण्याबरोबरच दररोज व्यायाम केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. शरीराला जर गरजेपेक्षा जास्त  प्रथिने मिळाले तर थकवा जाणवतो, मुत्राशयासंबंधीत आजार उद्भवतात. त्यामुळे आहारातील बदल हे तज्ञ्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)