भारतात कर्करोगाचे 14 लाख रुग्ण तर 9 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या अहवालात मोठा खुलासा

WHO report : एका वर्षात भारतात कर्करोगाने ग्रस्त 9 लाख लोकांचा मृत्यू झाला तर 14 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याचे एका अहवालाच स्पष्ट झाले आहे. 

Updated: Feb 2, 2024, 04:45 PM IST
भारतात कर्करोगाचे 14 लाख रुग्ण तर 9 लाख लोकांचा मृत्यू, WHO च्या अहवालात मोठा खुलासा    title=

India records 9 lakh cancer deaths : कर्करोग हा असा आजार आहे की त्याचे नाव ऐकताच लोक थरथर कापतात. हा आजार इतका वेगाने पसरत आहे की, आतापर्यंत भारतात एका वर्षात कर्करोग या आजाराने नऊ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर आतापर्यंत 14 लाख रुग्णांना कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अंदाजित जागतिक कर्करोगाची आकडेवारी दिली आहे. भारतात 2022 मध्ये 14.1 लाख नवीन कर्करोग प्रकरणे आणि 9.1 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. ज्यामध्ये स्तनाचा कर्करोग सर्वात सामान्य आहे. 

दरम्यान इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) च्या अंदाजानुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कॅन्सर एजन्सी तोंड आणि फुफ्फुसाचा कर्करोग पुरुषांमध्ये सर्वात सामान्य आहे. तर दुसरीकडे महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सर्वात सामान्य असल्याचे दिसून  आले आहे. गर्भाशयाच्या कर्करोगामुळे अभिनेत्री पूनम पांडे हिचा मृत्यू झाल्याचे समोर आल आहे. 

भारतात कर्करोगाचे निदान झाल्यानंतर 5 वर्षांच्या आत जिवंत लोकांची संख्या अंदाजे 32.6 लाख होती अशीही गणना करण्यात आली. एजन्सीचा अंदाज आहे की, जगभरात सुमारे 20 दशलक्ष नवीन कर्करोगाची प्रकरणे नोंदवली गेली आणि 97 लाख लोकांचा मृत्यू झाला. 

फुफ्फुसाचा कर्करोग सर्वात सामान्य

IARC ने वर्तवण्यात आले की, 2022 मध्ये जगभरात 10 प्रकारचे कर्करोग नवीन प्रकरणे आणि मृत्यूंपैकी दोन तृतीयांश आहेत. त्यांच्या डेटामध्ये 185 देश आणि 36 कर्करोगांचा समावेश आहे. विश्लेषणामध्ये असे आढळून आले की फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग आहे (एकूण नवीन प्रकरणांपैकी 12.4 टक्के) आणि कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमुख कारण देखील आहे, जे एकूण कर्करोगाच्या मृत्यूपैकी 19 टक्के आहे. तसेच कर्करोग एजन्सीने म्हटले आहे की, तंबाखूचे सतत सेवन केल्यामुळे ही फुफ्फुसाचा कर्करोगाची संख्या अधिक आहे. यामध्ये IARC ला आढळले की स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. 

कर्करोगासाठी जबाबदार असलेल्या 34 घटकांपैकी धूम्रपान, मद्यपान आणि प्रदूषक हे प्रमुख घटक असल्याचे आढळून आले. अभ्यासात असे म्हटले की, 'आशियातील वाढत्या वायू प्रदूषणामुळे कर्करोगाचा पुरावा चिंताजनक आहे.' संशोधकांच्या मते, बांगलादेश, नेपाळ आणि भारत या दक्षिण आशियाई देशांमध्ये गुटखा, पान मसाला, काळ्या तंबाखूचे सेवन ही चिंतेची बाब आहे. 2019 मध्ये, जगभरातील एकूण मृत्यूंपैकी 32.9 टक्के मृत्यू भारतात झाले असतील आणि ओठ आणि तोंडाच्या कर्करोगाच्या 28.1 टक्के नवीन प्रकरणांची नोंद झाली असेल. ते पुढे म्हणाले, 'कोलन कॅन्सरची 50 टक्क्यांहून अधिक प्रकरणे तंबाखूच्या सेवनाशी संबंधित आहेत. अलीकडच्या काळात भारतात त्याचा ट्रेंड वाढला आहे.